बिहारच्या लोकांकडून सोनूचे जंगी स्वागत, अभिनेत्यानेही घेतला प्रसिद्ध पदार्थाचा आस्वाद; व्हिडिओ व्हायरल

0
62
Sonu-Sood
Photo Courtesy: Instagram/sonu_sood

सोनू सूद देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेता बनला आहे. कोरोना विषाणूच्या महामारीपासून त्याने लाखो लोकांना मदत केली आहे. लोकांनी त्याला देवदूताचा दर्जा दिला आहे. हजारो लोक त्याची पूजा करतात. त्याने स्थलांतरित मजूर, कामगार आणि लोकांना मदत केली. त्याचबरोबर त्यांना अन्न-निवारा देण्यापासून हजारो लोकांना ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यापर्यंत सर्व काही केले आहे. नुकतेच साेनू सूद हा बिहारमध्ये पाेहोचला आणि त्याच्याभोवती विमानतळावरच चाहत्यांनी गर्दी केली.

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यानेही चाहत्यांना नाराज केले नाही. सर्वांचे अभिवादन केले. यादरम्यान चाहत्यांनी अभिनेतासाठी लिट्टी-चोखा (Litti Chokha) आणले आणि अभिनेताने देखील खूप आवडीने बिहारचे प्रसिद्ध पदार्थ खाल्ले.

साेनू सूदचे ज्याप्रकारे बिहारमध्ये स्वागत झाले, त्यामुळे ताे भलताच आनंदी दिसला. त्याने इंस्टाग्रामवर आपला व्हिडिओ शेअर केला, ज्यात ताे लिट्टी-चोखा खाण्याचा आस्वाद घेत आहे. साेनूने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “बिहारने लिट्टि- चाेखाने स्वागत केलं, आभार.” व्हिडिओमध्ये चाहते ‘साेनू सूद जिंदाबाद’ अशी घाेषणा देत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

साेनूने गेल्या गुरुवारी बिहारमधील बॅरिया येथील ज्ञानस्थळी हायस्कूला भेट दिली. येथे गरीब व गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या सहकार्याबद्दल व्यवस्थापनातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. सोनूने सांगितले की, “मला बिहारवर प्रेम आहे. येथील लोक खूप छान आणि प्रेमळ आहेत.” साेनूचे म्हणणे आहे की, “मुलांसाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे.” त्यामुळे ताे अनेक गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलताे.

साेनूच्या वर्कफ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर सोनू सूद शेवटचा ‘सम्राट पृथ्वीराज’मध्ये दिसला होता. त्याने अलीकडेच ‘कमांडर करण सक्सेना’ नावाच्या पॉडकास्टसह ऑडिओ स्पेसमध्ये प्रवेश केला, जो स्पॉटिफायवर स्ट्रीम करण्यात आले आहे. हे पॉडकास्ट देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी लढणाऱ्या गुप्त एजंटच्या प्रवासाबद्दल आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांना बेधुंद करणारा अमलाचा हॉट लूक, फोटो पाहून काळजात वाजेल घंटी
तेजस्वीला घर खरेदी करून देण्यात करण कुंद्राचा मोठा हात? आगपाखड करत अभिनेता म्हणाला, ‘ती माझ्या…’
वाऱ्याची एकच झुळूक अन् उर्फीचा खेळच खल्लास! सगळ्यांसमोर अशी झाली अभिनेत्रीची फजिती, नेटकरीही भडकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here