मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विन डिझेल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हॉलीवूड अभिनेता विन डिझेलने ‘फास्ट अँड फ्यरियस’ या चित्रपट मालिकेतून घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. विन डिझेलवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. ‘फास्ट अँड फ्युरियस’ फेम अभिनेत्यावर त्याची माजी सहाय्यक अस्टा जोनासनने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. कायदेशीर तक्रारीत जोनासनने अभिनेत्यावर तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. माजी सहायकाने गुरुवारी फिर्याद दाखल केली. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
माध्यमातील वृत्तनुसार, विन डिझेलवर त्याचा माजी सहाय्यक अस्टा जोनासनने केलेले आरोप खूपच आश्चर्यकारक आहेत आणि या प्रकरणात तिने म्हटले आहे की, ‘2010 मध्ये फास्ट फाइव्ह चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विनने जॉर्जियामधील एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. त्याने तिच्यावर बळजबरी केली होती. हॉटेलच्या खोलीत तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा विनने तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली.
कायदेशीर तक्रारीत माजी असिस्टंटने म्हटले आहे की, विनच्या कंपनीने अनेक कामे केली आहेत. यामध्ये सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी डिझेलची व्यवस्था करणे आणि त्याच्यासोबत असणे. अस्टा जोनासनच्या फर्म ग्रीनबर्ग ग्रॉसने एका निवेदनात या गोष्टी सांगितल्या. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्यांना त्यांच्या ग्राहकांसोबत उभे राहून विन डिझेलच्या विरोधात आवाज उठवण्यात अभिमान वाटतो.
हॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय चित्रपट मालिकांमध्ये ‘फास्ट अँड फ्युरियस’ या चित्रपटाचे नाव घेतले जाते. आतापर्यंत या चित्रपटाचे दहा भाग प्रदर्शित झाले असुन प्रेक्षकांनी तिला चांगला प्रतिसाद दिला आहे. ‘फास्ट अॅण्ड फ्युरियसच्या सातव्या भागामध्ये भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही काम केले आहे.
आधिक वाचा-
–उदयपूरमध्ये शिल्पा शेट्टीने घेतला सुट्ट्यांचा आनंद, मुलांना दाखवले ग्रामीण भागातील जीवन
–‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्री ईशा तलवार आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालकीण, सलमानसोबतही केले आहे काम