Monday, July 1, 2024

लॉकडाऊनमुळे बॉलिवूडवर येऊ शकते मोठे संकट, कामगार संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रभाव वाढताना दिसत आहे. तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. याचा परिणाम बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर देखील होताना दिसत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्ल्पॉयी यांनी उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊन नको याबाबत पत्र लिहिले आहे. अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकल्यामुळे अनेक चित्रपटांची शूटिंग थांबली आहे. लॉकडाऊन झाल्यावर चित्रपटसृष्टीला बसणारा फटका लक्षात घेता, त्यांनी पत्र लिहिले आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्ल्पॉयी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राची कॉपी चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केली आहे. अशोक पंडित हे बीजेपीचे कट्टर समर्थक समजले जातात. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन न करण्याबाबत विनंती केली आहे. लॉकडाऊन झाले, तर सगळ्यांच्या पोटा- पाण्याचा प्रश्न उभा राहू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

अशोक पंडित यांनी केलेल्या ट्विटनुसार, महाराष्ट्र शासनाने जर पुन्हा लॉकडाऊन केले, तर मनोरंजन क्षेत्रावर याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यांचा असा दावा आहे की, फेडरेशन चित्रपटाचे शूटिंग‌‌ सरकारद्वारे आलेल्या बंधनकारक नियमांनुसार करवून घेत आहे. यासोबतच पुढेही याचे पालन करवून घेण्याचे वचन त्यांनी दिले आहे. चित्रपटक्षेत्रात देखील कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. नुकतेच एका रियॅलिटी शोच्या शूटिंगदरम्यान अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते.

कोरोनाची दुसरी लाट चित्रपटसृष्टीवर देखील मोठा परिणाम करताना दिसत आहे. अनेक मोठ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. ‘बंटी और बबली 2’ आणि ‘सुर्यवंशी’ या चित्रपटांच्या तारखा पुढे- मागे होत आहेत. तसेच अमिताभ बच्चन यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख रद्द झाली आहे. रात्रीची संचारबंदी चालू झाल्यामुळे चित्रपटांच्या शूटिंग रखडल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अनेक कलाकारांवर झालेला दिसून येत आहे. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, आमिर खान, फातिमा सना शेख, परेश रावल, सिद्धांत चतुर्वेदी, संजय लीला भन्साळी यासारख्या अनेक कलाकारांवर झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार कोरोनाच्या तावडीत, सोशल मीडियावरून दिली माहिती

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

हे देखील वाचा