भारतीय स्वातंत्र्यदिनाला अवघे काही दिवस राहिले असून देशभरात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्टची जय्यत तयारी सर्वत्रच सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या जय्यत तयारीसोबतच सध्या सोशल मीडियावर एक गाणे जोरदार व्हायरल होत आहे. हर घर तिरंगा असे या गाण्याचे नाव असून इंडियन आयडॉल फेम तसेच लोकप्रिय युट्यूबर फरमानी नाजने हे गाणे गायले असून गाण्याने सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे.
सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेटच्या जगतात नेहमीच नवनवीन गोष्टी पाहायला मिळत असतात. सध्या भारतीय स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू असतानाच हर घर तिरंगा हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाणे इंडियन आयडॉल फेम लोकप्रिय सिंगर फरमान नाजने गायले आहे. तिचे याआधीचे हर हर शंभो हे गाणेही तुफान व्हायरल झाले होते. आता फरमानच्या हर घर तिरंगा या गाण्याने नेटकऱ्यांना वेड लावले असून आत्तापर्यंत युट्यूबवर या गाण्याला १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तिच्या या गाण्याची सोशल मीडियावर तुफान चर्चाही पाहायला मिळत आहे.
https://www.facebook.com/watch/?ref=external&v=463752301968965
नाजने काही दिवसांपूर्वीच तिचे ‘हर घर तिरंगा’ हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या गाण्याचे गितकार अनुज मुल्हेडा असून त्याला संगीत परविंदर सिंग यांनी दिले आहे. नाजच्या टीमने या गाण्यातून देशवासियांना एकतेचा संदेश दिला आहेे. नाजने गाण्याच्या सुरूवातीला पगडी, दुपट्टा आणि बॅंन्डचा पेहराव केला आहे. तिच्या पहिल्या गाण्याप्रमाणेच या गाण्यालाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
फरमानी नाजच्या गाण्यामुळे नेटकऱ्यांचीही तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. फरमान उत्तरप्रदेशमधील मुझफ्फर जिल्ह्याची रहिवासी आहे. परंतु तिच्या गाण्याने तिने देशभरात लोकप्रियता मिळवली आहे. इंडियन आयडॉलमध्येही ती सहभागी झाली होती. ज्यामुळे जोरदार लोकप्रियता मिळाली होती. तिचे युट्यूबला तब्बव ४० लाख इतके सबस्क्रायबर आहेत.
हेही वाचा –
झोप विसरून रात्री साडेबारा वाजता सोनूसाठी जेवण बनवायचा जॅकी चॅन, अभिनेत्याने सांगितला भन्नाट किस्सा
साठीतही प्रचंड उत्साही! निधनानंतर प्रदिप पटवर्धन यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल
ब्रेकिंग! प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका, दिल्लीच्या मोठ्या रुग्णालयात दाखल