Wednesday, March 22, 2023

झोप विसरून रात्री साडेबारा वाजता सोनूसाठी जेवण बनवायचा जॅकी चॅन, अभिनेत्याने सांगितला भन्नाट किस्सा

‘कुंग फू योगा’ या चित्रपटात सोनू सूद आणि जॅकी चॅन हे दोन्ही अभिनेते मुख्य भूमिकेमध्ये दिसले होते. २०१७ मध्ये आलेल्या या सिनेमात दिशा पटानी, अमायरा दस्तूर आणि चीनी अभिनेता आरिफ रहमान देखील चित्रपटमध्ये हे कलाकार दिसला होते. त्यात अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर आणि कॉमेडी भरलेला चित्रपट होता. सोनू सूद आणि जॅकी चॅन दोघेही अभिनेते खऱ्या आयुष्यात चांगले व्यक्ती आहेत. जिथे सोनूने लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्याचबरोबर जॅकीनेही अभिनेत्याला मदत करून लोकांच्या नजरेत स्वत:ला एक चांगला माणूस असल्याचे सिद्ध केले आहे. याचा पुरावा स्वत: सोनू याने दिला आहे.

माध्यमाना दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सोनू सूद (Sonu Sood) याने खुलासा केला की, जॅकीने रात्री जागून त्याच्यासाठी आणि त्याच्या मित्रांसाठी जेवण बनवले होते. जॅकीसोबत घालवलेला वेळ आठवून त्याने माध्यमांना सांगितले की, “त्याच्यासोबतचा हा अनुभव खूप छान होता. त्याचं आणि माझं फार चागलं जमायचं. जॅकी डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. ते सेटवर फळांची पाकिटे आणत होते आणि मग लाइट मॅन, स्पॉट बॉय आणि अभिनेत्यांना खायला द्यायचे आणि तो स्वतः जमिनीवर बसायचा, आणि मग खा म्हणत होता.”

जॅकी चॅन रात्री जेवण बनवायचा
पुढे बोलताना सोनू म्हणतो की, जॅकी चॅन रात्री जेवण बनवण्यासाठीही स्वत:च तयार होतो. तो म्हणतो, “तो रात्री म्हणायचा की, मी तुझ्यासाठी जेवण बनवेल. माझ्यासोबत एक मित्र होता. जॅकी चॅनने आमच्या सर्वांसाठी किचनमध्ये जेवण बनवले. ते फार काही मोठे नव्हते. तो चड्डी आणि बनियान घालायचा. माझ्या मित्राचा विश्वास बसत नव्हता की, रात्रीचे १२:३०, १.०० वाजले होते आणि आम्हाला भूक लागली आहे, म्हणून जॅकी चॅन आमच्यासाठी स्वयंपाक करत आहे. एवढेच नाही तर ताटात अन्न सोडले, तर तो तुम्हाला आधी विचारतो आणि नंतर खाऊन संपवतो. म्हणजे जॅकी अन्नाता नासही करत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

सोनू सूदच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या सिनेमात झळकला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अक्षय कुमार, संजय दत्त आणि मानुषी छिल्लर यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
भांडं फुटताच सुष्मिताने ललित मोदींच्या पाठीत खुपसलं खंजीर, पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात पडली अभिनेत्री?
ट्रोलर्सला कंटाळून आमिरने एकदाच बोलून टाकले, ‘आता मला माफ करा’, व्हिडिओ पाहून चाहतेही भावूक
‘जर एखाद्या मुलीला सेक्स करायचा असेल, तर ती धंदा…’, प्रसिद्ध अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य

हे देखील वाचा