Saturday, June 29, 2024

हृतिक-दीपिकाच्या ‘फायटर’चे पहिला पोस्टर रिलीज; ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणजे हृतिक रोशन(Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण(Deepika Padukone) पहिल्यांदाच ‘फायटर’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अलीकडेच, हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत एक मोठी घोषणा केली आहे. फायटर 2023 मध्ये रिलीज होणार होती. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत सुरुवातीपासूनच बरेच बदल करण्यात आले आहेत. पण आता या एरियल ऍक्शन ड्रामा ‘फायटर’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे, ज्यामध्ये फाईट प्लेनवर रिलीजची तारीख स्पष्टपणे लिहिलेली आहे.

फायटरचा फर्स्ट लुक समोर
फायटरचा फर्स्ट लुक समोर आला आहे. पोस्टरवर फायटर प्लेन आकाशात उडताना दिसत आहेत. ज्यावर लिहिले आहे ‘फायटर’ 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटाची आधीच चर्चा आहे. लोक त्यांच्या दोन्ही आवडत्या स्टार्सला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हृतिक-दीपिका स्टारर ‘फायटर’ या चित्रपटात हे दोन्ही कलाकार भारतीय वायुसेनेच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. भारताच्या सशस्त्र दलाच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीला आदरांजली वाहणाऱ्या या चित्रपटात अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ऍक्शन आणि सस्पेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत हृतिक रोशनचा हा तिसरा चित्रपट आहे.याआधी, या दोघांच्या जोडीने 2014 साली ‘बँग बँग’ आणि 2019 चा ब्लॉकबस्टर ‘वॉर’ यांसारख्या चित्रपटांसह मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे.

हा चित्रपट 2024 साली होणार प्रदर्शित
अलीकडेच, सिद्धार्थ आनंदने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटासाठी व्हीएफएक्स बनवणाऱ्या ‘डीएनईजी’ सोबत त्याच्या फायटर चित्रपटासाठी करार केला आहे. अहवालात म्हटले आहे की, फायटर हा काही उत्कृष्ट हवाई अ‍ॅक्शन सीक्वेन्ससह एक सुपर ऍक्शन चित्रपट आहे. जो भारतीय प्रेक्षकांसाठी एक उत्तम अनुभव असणार आहे.

हृतिक-दीपिका पहिल्यांदाच दिसणार एकत्र
यासोबतच सिद्धार्थ आनंदने दावा केला की, ‘भारताच्या पहिल्या एरियल ऍक्शन फ्रँचायझीमध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणला पाहण्यासाठी सज्ज व्हा’. व्हीएफएक्ससाठी ऑस्करमध्ये अनेकवेळा पुरस्कार मिळालेल्या एजन्सीलाही नियुक्त करण्यात आले आहे. असेही नमूद करण्यात आले की निर्माते चित्रपट निर्मितीच्या संकरित मॉडेलसाठी जाण्याचा विचार करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर फायटर चित्रपटाव्यतिरिक्त हृतिक रोशन ‘क्रिश 4’ या चित्रपटात दिसणार आहे. हृतिक रोशन शेवटचा ‘विक्रम वेधा’ चित्रपटात दिसला होता. फायटर या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिका पदुकोण ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. दीपिका पदुकोण ‘सर्कस’ आणि ‘जवान’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. दीपिका पदुकोण शेवटची ‘गेहराईं’ चित्रपटात दिसली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पांढऱ्या साडीमध्ये हिनाचे फुलले सौंदर्य! पाहिलात का अभिनेत्रीचे नवीन फोटो?

कांतारा का अडकलाय वादाच्या भोवऱ्यात? जाणून घ्या एका क्लीकवर

हे देखील वाचा