Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘फायटर’ चित्रपटातील कलाकारांनी घेतली कोटींमध्ये फी, दीपिकाला मिळाले सगळ्यात कमी पैसे

‘फायटर’ हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी २०२४ मध्ये दर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतातील पहिल्या एरियल अॅक्शन चित्रपटाच्या स्टार कास्टने किती शुल्क आकारले ते जाणून घेऊया.

या चित्रपटासाठी हृतिक रोशनने सर्वाधिक फी घेतली आहे. माध्यमातील वृत्तानुसार या चित्रपटासाठी अभिनेत्याला 50 कोटी रुपये फी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर या चित्रपटाची लीड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिला या चित्रपटासाठी केवळ 15 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या चित्रपटात अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी अभिनेता 7 कोटी रुपये मानधन घेत आहे.

या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हरही दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याला फक्त २ कोटी रुपये मिळत आहेत. त्याचवेळी या चित्रपटाचा आणखी एक अभिनेता अक्षय ओबेरॉय या चित्रपटासाठी एक कोटी रुपये मानधन घेत आहे.

हृतिक आणि दीपिकाचा चित्रपट फायटर हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुढील वर्षी 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

जेव्हा रफी साहेबांच्या गळ्यातून गाणं गाताना आला होते रक्त, सतत १५ दिवस केला होता रियाज
लता दीदी अन् मोहम्मद रफींमध्ये असे काय झाले होते की, तब्बल ४ वर्षे गायले नव्हते एकत्र गाणे

हे देखील वाचा