‘पंगा क्वीन’च्या अडचणीत वाढ; बेळगावात झाली कंगणाविरोधात तक्रार दाखल, जाणून घ्या काय आहे कारण


मागच्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये चालू असणारे शेतकरी आंदोलन देशासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गाजत आहे. या आंदोलनाबद्दल पॉप गायिका रेहानाने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले, आणि एकच वादंग उसळला होता. रेहनासोबत अनेक परदेशातील सेलिब्रिटींनी या आंदोलनाच्या विरोधात त्यांचे मत मांडले. त्यातही रेहनाचे ट्विट सर्वात जास्त गाजले.

रेहानाने ट्विट केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी रेहानाच्या ट्विटला उत्तर देतांना देशाच्या अंतर्गत समस्यांमध्ये बाहेरच्यांनी दखल देऊ नये, अशा आशयाचे ट्विट केले. यात सचिन तेंडुलकरपासून, विराट कोहली, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आदी सेलिब्रिटींचा समावेश होता. याच ट्विटला उत्तर देताना कंगनाने शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणून संबोधले होते आणि त्यामुळे एकच वाद सुरु झाला. या ट्विटमुळे कर्नाटकमधल्या बेळगावमध्ये तिच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

कंगनाने रेहानाच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले होते, “कोणीही त्यांच्याबद्दल बोलत नाही त्याचे कारण म्हणजे ते शेतकरी नसून देश तोडणारे आतंकवादी आहेत. जेणेकरून चीनला आमच्या देशावर ताबा मिळवता येईल. गप्प बसा मुर्ख लोंकांनो.” कंगनाच्या याच ट्विटविरोधात बेळगाव येथील वकिलाने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मनोरंजन क्षेत्रातील मनोरंजक बातम्यांसाठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉइन करा येथे क्लिक करा…

वकिलांनी कंगना विरोधात आईपीसी कलम १५३, १५४, ५०३, ५०४, ५०५-१, ५०५ अ, ५०५ ब, ५०५-२ आणि ५०६ या अंतर्गत ही तक्रार नोंदवली आहे. सोबतच अशा कलाकारांविरोधात देखील तक्रार करणार आहे, ज्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. अजूनपर्यंत एफआईआर दाखल झाली नसली, तरी कारवाई सुरु झाली आहे.

महाराष्ट्रातही कंगणाच्या या वक्तव्याविरोधात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. कंगनाचा पुतळा देखील जाळण्यात आला होता.

हेही वाचा
– कंगना रणौतचा बिग बजेट धाकड सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; एका सीनच्या शूटिंगसाठी आला तब्बल इतके कोटी खर्च
– बहीण असावी तर कंगनासारखी! भावंडांना गिफ्ट केलेल्या फ्लॅटची किंमत वाचून शाॅक बसेल; जाणून घ्या
–  अभिनेत्री कंगना रणौत लवकरच होणार पंतप्रधान, अशाप्रकारे करणार काम सुरु

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.