Friday, April 26, 2024

बहीण असावी तर कंगनासारखी! भावंडांना गिफ्ट केलेल्या फ्लॅटची किंमत वाचून शाॅक बसेल; जाणून घ्या

अभिनेत्री कंगना राणावत ही आजकाल खूपच बिझी आहे. ती सध्या एक दोन नव्हे तर तिच्या येणाऱ्या तब्बल 4 चित्रपटांची तयारी करत आहे. दरम्यान सध्या तिच्या कौंटुबिक बाबतीत एक महत्वाची आणि खास माहिती समोर येत आहे. कंगनाने अलिकडे तिच्या भाऊ आणि बहिणीला एक गिफ्ट दिलं आहे. आणि त्या गिफ्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

कंगनाने तिची बहीण रंगोली, भाऊ अक्षत आणि तिच्या 2 इतर भावंडांना फ्लॅट गिफ्ट केला आहे. मात्र, या फ्लॅटची किंमत वाचून तुमची झोप उडेल. कंगनाने तिच्या भावंडांना गिफ्ट केलेल्या फ्लॅटची किंमत ही कोटींच्या घरात असून ती कमीथोडकी नसून तब्बल 4 कोटी इतकी आहे.

कंगना ही तिच्या भावा-बहिणींना नेहमीच मदत करत असते. तिने वारंवार तिच्या कृतीतून हे सिद्ध देखील केले आहे. यावेळी तिने चंदिगडमध्ये एका चांगल्या भागात हे फ्लॅट्स घेतले आहेत.

कंगनाने आधीही तिचा भाऊ अक्षत याच्या लग्नाचा सगळा खर्च केला आहे. त्याचे लग्न अगदी शाही अंदाजात उदयपुर मध्ये केले होते. काही दिवस आधी कंगनाने तिच्या बहिणीचे लग्न देखील करून दिले होतं. या दोघांच्याही लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने नुकताच एक‌ नवीन चित्रपट साईन केला आहे. त्या चित्रपटाचे नाव आहे, ‘मणीकर्णिका रिटर्न्स : दी लिजंड ऑफ जिद्दा’ हे आहे. यासोबतच कंगनाचे आणखीन 2 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

हे देखील वाचा