शुक्रवारी (दि. 09 सप्टेंबर) चित्रपटगृहात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र‘ हा सिनेमा प्रदर्शित झाला. रणबीरचा मागील सिनेमा ‘शमशेरा’ जोरात आपटला होता. त्यामुळे त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’चेही असेच काहीसे होते का, अशी चर्चा होती. मात्र, त्याचा हा सिनेमा बक्कळ कमाई करत आहे. असे असले, तरी या सिनेमाच्या कमाईचे वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. त्यामुळे हे आकडे चाहत्यांना गोंधळात टाकत आहेत. अभिनेत्री कंगना रणौत हिने सांगितले की, निर्माते बॉक्स ऑफिसचे बनावट आकडे सांगत आहेत. चला तर ‘ब्रह्मास्त्र’ची खरी कमाई किती आहे जाणून घेऊया…
खरं तर, भारत आणि भारताबाहेर प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनचे मोजमाप वेगवेगळ्या प्रकारे केले जाते.
विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला सिनेमा
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच, शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या कॅमियोने प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत केला आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये दमदार कामगिरी केली आहे. वेगेवगळ्या भाषा आणि देशांच्या या मिश्रणाने ‘ब्रह्मास्त्र’ची कमाई सांगणे खूपच आव्हानात्मक झाले आहे.
नेट आणि ग्रॉसमधील फरक काय? (Difference Between Nett And Gross)
‘ब्रह्मास्त्र’चा निर्माता करण जोहरबद्दल कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने प्रश्नचिन्ह उपस्थित केला की, ते नेट कमाईऐवजी, सिनेमाची ग्रॉस कमाई का शेअर करत आहेत? खरं तर, ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन हे सिनेमाच्या तिकीट विक्रीतून झालेली कमाई दाखवते. हा नेहमीच एक मोठा आकडा असतो. दुसरीकडे, नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन हे सेवा आणि मनोरंजनसारखे अनेक कर वजा करून झालेली कमाई दाखवते. मात्र, प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर असतात. याव्यतिरिक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनचा तिसरा पैलू वितरकांची भागीदारी आहे.
वेगवेगळ्या प्रकारे होते मोजमाप
या सिनेमाने जगभरात आतापर्यंत तब्बल 225 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचा अर्थ असा होत नाही की, या सिनेमाच्या निर्माते आणि वितरकांनीही इतकीच कमाई केली आहे. त्यांचा भाग खूपच कमी आहे. दुसरीकडे, राज्य आणि देशातील काम करण्याची पद्धत वेगळी असते. अमेरिकेत ग्रॉस कलेक्शनला महत्त्व दिले जाते, पण बॉलिवूडमध्ये नेट कलेक्शन दाखवले जाते. याव्यतिरिक्त भारताच्या दक्षिण भागात ग्रॉस कलेक्शन दाखवले जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारे मोजमाप केल्यामुळेही ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या कलेक्शनवरून गोंधळ उडाला आहे.
‘इतके’ आहे सिनेमाचे कलेक्शन
माध्यमांतील वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाने पहिल्या आठवड्यात 105 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसरीकडे, इंडस्ट्री ट्रॅकर या वेबसाईटनुसार, या सिनेमाने भारतात पहिल्या तीन दिवशी 146 कोटी रुपये कमावले आहेत. या कमाईतील अंतर असे की, पहिले कलेक्शन हे हिंदी पट्ट्यातील फक्त नेट कलेक्शन आहे, तर दुसरे कलेक्शन हे सर्व भाषांत सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरचे आहे. म्हणजेच, सिनेमाच्या कलेक्शनमध्ये कोणताच फेरफार नाहीये, फक्त वेगवेगळ्या इंडस्ट्रीत वेगवेगळे पॅटर्न वापरले जातात.
‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा 410 कोटी रुपयांमध्ये बनून तयार झाला आहे. मात्र, सिनेमाने बजेटइतकी कमाईदेखील केली नाहीये. मात्र, रणबीर आणि आलियाच्या या सिनेमाबद्दल चांगली बातमी अशी की, या महिन्यात इतर कोणताही मोठा सिनेमा प्रदर्शित होत नाहीये, ज्याचा फायदा ‘ब्रह्मास्त्र’ला झाला पाहिजे. या महिन्याच्या शेवटी 30 सप्टेंबरला ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ प्रदर्शित होतोय. मात्र, या सिनेमाला प्रदर्शित होण्यासाठी अजून दोन आठवड्यांचा अवकाश आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महिमाने सगळ्यांसमोर आणलेली बॉलिवूडची काळी बाजू; म्हणालेली, ‘व्हर्जिन अभिनेत्री नसेल, तर…’
‘अगं अगं आई…’, म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा ओंकार दिसणार मुख्य भूमिकेत, पण नायिका कोण?
प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! जाणून घेऊया ‘व्हिक्टोरिया’चे रहस्य