Monday, July 1, 2024

फिल्मफेयर पुरस्कारांची घोषणा, इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

हा महिना संपल्यानंतर २०२१ वर्ष संपणार असून, कोरोना महामारीनंतर हे वर्ष बॉलिवूड विश्वासाठी पुनरागमनाचे वर्ष होते आणि कलाकारांनीही यावर्षी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणेच मुंबईत फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात तापसी पन्नू  (Taapsee Pannu) हिच्या ‘थप्पड’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर त्याच दिवंगत इरफान खान (Irrfan khan) याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या कलाकारांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत.

सर्वोत्कृष्ट चित्रपट

तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) ‘थप्पड’ चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक पुरस्कार जिंकले.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

अजय देवगण (Ajay Devgan)अभिनित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’चे दिग्दर्शक ओम राऊत यांना यावेळी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेता

मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘अंग्रेजी मीडियम’चा अभिनेता इरफान खान (Irrfan khan ) याला मिळाला आहे. इरफान खानने एप्रिल २०२० मध्ये संपुर्ण जगाचा निरोप घेतला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (फिमेल)

अभिनेत्री तापसी पन्नूला ‘थप्पड’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता (सहाय्यक भूमिका)

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला ओम राऊतच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट कलाकार (सहाय्यक फीमेल)

अभिनेते अमिताभ बच्चन अभिनित ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या फारुख जफर हिला हा पुरस्कार मिळाला.

सर्वोत्कृष्ट पदार्पण (फिमेल)

नितीन कक्करच्या ‘जवानी जानेमन’मध्ये आलिया फर्निचरवालाला हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटात सैफ अली खान, तब्बू, कुबरा सेठ, चंकी पांडे, कुमुद मिश्रा असे अनुभवी कलाकार होते.

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक

ओटीटी प्लॅटफॉर्मवर २०२० मध्ये आलेल्या लूटकेस चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश कृष्णन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ज्याने टीव्हीएफ ट्रिपलिंग वेब सीरिजचे दिग्दर्शनही केले आहे.

सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम

प्रीतमला नेटफ्लिक्सवरील ‘लुडो’ चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (मेल)

हा पुरस्कार राघव चैतन्य यांना ‘थप्पड का एक तुकडे धूप’ या गाण्यासाठी देण्यात आला आहे.

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (फिमेल)

दिशा पटानी (Disha Patani) आणि आदित्य रॉय कपूर अभिनित ‘मलंग’ चित्रपटाच्या ‘हुई मलंग’ या शीर्षक गीतासाठी असीस कौरला हा पुरस्कार मिळाला आहे.

हेही नक्की वाचा-

-असे काय झाले की, महिला स्पर्धकासमोर रणवीर सिंगला झुकवावे लागले डोके? व्हिडिओ जोरदार व्हायरल-काय बिनसलं! सारा अली खान आणि ‘बिग बॉस १५’च्या स्पर्धकामध्ये घडले ‘असे’ काही, अभिनेत्रीनेही चांगलेच सुनावले-‘या’मुळे कुमार सानू यांनी घेतला अनु मलिकचा बदला, ‘सा रे गा मा पा’मध्ये सांगितले कारण

हे देखील वाचा