Monday, April 15, 2024

फिल्मफेयर पुरस्कार २०२३! ‘या’ कलाकारांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्रीचा पुरस्कार वाचा संपूर्ण यादी

मनोरंजनविश्वातील अतिशय मोठा आणि मानाचा समजला जाणारा फिल्मफेयर अवॉर्ड सोहळा नुकताच मुंबईमध्ये संपन्न झाला. दरवर्षी कलाकारांसोबतच प्रेक्षकांना देखील या सोहळ्याची मोठी आतुरता असते. वर्षभर केलेल्या कंची पोचपावती म्हणून कलाकारांना त्यांच्या उत्तम सादरीकरणासाठी या पुरस्काराने गौरवले जाते. फिल्मफेयरची पत्रकार परिषद झाल्यापासूनच या पुरासकरांची सगळ्यांना उत्सुकता होती. ६८ व्या फिल्मफेयर पुरस्कारांचे सूत्रसंचालन सलमान खानने केले.

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अनेक मोठमोठ्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमानसोबतच आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल यांनी देखील या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. दरम्यान, आता या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांच्या नावांची यादी समोर आली आहेत.

यावर्षीच्या फिल्मफेयर पुरस्कारांवर ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘बधाई दो’ या चित्रपटांचे वर्चस्व दिसले. संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने १० पुरस्कार पटकावले, तर हर्षवर्धन कुलकर्णीच्या ‘बधाई दो’ने क्रिटीक्स अवॉर्ड कॅटेगरीमध्ये सर्वाधिक सहा पुरस्कार जिंकले. अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र: भाग-१ शिवा’ या चित्रपटालाही चार कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला आहे.

बेस्ट सपोर्टिंग रोल फॉर मेल- अनिल कपूर, जुग जुग जियो.

बेस्ट सपोर्टिंग रोल फॉर फीमेल- शीबा चड्ढा, बधाई दो के लिए.

बेस्ट डायलॉग- प्रकाश कपाड़िया और उत्कर्षिनी वशिष्ठ, गंगूबाई काठियावाड़ी.

बेस्ट स्क्रीनप्ले- अक्षत घिल्डियाल, सुमन अधिकारी और हर्षवर्धन कुलकर्णी, बधाई दो.

बेस्ट कहानी- अक्षत घिल्डियाल और सुमन अधिकारी, बधाई दो.

बेस्ट डेब्यू, मेल- अंकुश गेदम, झुंड.

बेस्ट डेब्यू, फीमेल- एंड्रिया केविचुसा, अनेक.

बेस्ट डेब्यू डायरेक्टर- जसपाल सिंह संधू और राजीव बरनवाल, वध.

बेस्ट लीरिक्स- अमिताभ भट्टाचार्य, ब्रह्मास्त्र: भाग एक – शिव सॉन्ग केसरिया.

बेस्ट प्लेबॅक सिंगर, मेल- अरिजीत सिंह, ब्रह्मास्त्र सॉन्ग केसरिया

बेस्ट प्लेबॅक सिंगर, फीमेल- कविता सेठ, जुग जुग जीयो सॉन्ग रंगिसारी.

बेस्ट कोरियोग्राफी- गंगूबाई काठियावाड़ी की धोलिदा के लिए कृति महेश.

बेस्ट कोरियोग्राफी- सुदीप चटर्जी, गंगूबाई काठियावाड़ी.

बेस्ट एक्शन- परवेज शेख, विक्रम वेधा.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

धक्कादायक! ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याला निर्मात्यांनी केले बॅन, अभिनेत्याची लिखित प्रतिक्रिया व्हायरल

जेलमधील ‘त्या’ कटू अनुभवांना सांगताना क्रिसनला अश्रू अनावर, कॉफीसाठी टॉयलेटचे पाणी तर…

हे देखील वाचा