कोरोना महामारीत (Covid-19) जनतेला खूप जास्त समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना गमावले आहे. अनेकांना त्यांची नोकरी आणि व्यवसाय देखील गमवावा लागला आहे. या काळात मनोरंजन क्षेत्रावर देखील मोठा परिणाम झाला आहे. चित्रपटगृहे पूर्णपणे बंद होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. यामुळे अनेक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली, तर अनेक नवीन विषय आल्याने घर बसल्या प्रेक्षकांचे देखील मनोरंजन केले. अशातच फिल्मफेअरने २०२१ च्या ओटीटी अवॉर्ड्सची घोषणा केली आहे. यात प्रतीक गांधी याच्या ‘स्कॅम १९९२’ (scam 1992) या वेबसीरिजला सर्वात जास्त अवॉर्ड्स मिळाले आहेत. चला तर जाणून घेऊया या सोहळ्याची विजेत्यांची संपूर्ण यादी.
‘स्कॅम १९९२’ (scam 1992)ला मिळालेले अवॉर्ड्स
बेस्ट ओरिजनल साउंडट्रॅक अवार्ड, अंचित ठक्कर-स्कॅम १९९२
बेस्ट बैकग्राउंड म्युझिक अवार्ड, स्कॅम १९९२ ट्रॅक
बेस्ट प्रोडक्शन डिझाइन अवार्ड, स्कॅम१९९२
बेस्ट कॉस्ट्यूम डिझाइन अवार्ड, स्कॅम १९९२
बेस्ट वीएफएक्स अवार्ड, स्कॅम १९९२
बेस्ट सिनेमॅटोग्राफर अवार्ड, स्कॅम १९९२
बेस्ट डायलॉग अवार्ड, स्कॅम १९९२
बेस्ट अडेप्टिव स्क्रीनप्ले अवार्ड, स्कॅम१९९२
सर्वश्रेष्ठ संपादन अवार्ड, स्कॅम १९९२
बेस्ट एक्टर अवार्ड, प्रतीक गांधी – स्कॅम १९९२
बेस्ट निर्देशक, हंसल मेहता – स्कॅम१९९२
‘फॅमिली मॅन २’ (family man 2) ला मिळालेले अवॉर्ड्स
बेस्ट ओरिजनल स्टोरी, ‘द फॅमिली मॅन २’
बेस्ट ओरिजनल स्क्रीप्ले, ‘द फॅमिली मॅन २’
ओटीटीवरील इतर अवॉर्ड्स
बेस्ट नॉन फिक्शन ओरिजिनल, बॅड बॉय बिलियनेयर्स
बेस्ट सपोर्टिंग एक्टर, वैभव राज गुप्ता-गुल्लक
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस, कॉमेडी, सुनीता रजवार, गीतांजलि कुलकर्णी-गुल्लक
बेस्ट कॉमेडी सीरीज स्पेशल, गुल्लक
बेस्ट सपोर्टिंग एक्टर, ड्रामा सीरीज, शारिब हाशमी-फॅमिली मॅन
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस, ड्रामा सीरीज, अमृता सुभाष, बॉम्बे बेगम
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस, वेब ओरिजनल, राधिका मदान रे
बेस्ट एक्टर वेब ओरिजिनल, नाजुद्दीन सिद्दीकी – सीरियस मेन
बेस्ट सीरीज, क्रिटिक्स, मिर्जापुर सीजन २
बेस्ट एक्ट्रेस,ड्रामा सीरीज़- हुमा कुरैशी, महारानी
बेस्ट एक्टर, क्रिटिक्स- मनोज बाजपेयी
बेस्ट डायरेक्टर, क्रिटिक्स, सुपर्ण वर्मा-फॅमिली मॅन
बेस्ट एक्ट्रेस ड्रामा सीरीज, सामंथा- फॅमिली मॅन
हेही वाचा :










