Sunday, January 26, 2025
Home साऊथ सिनेमा मोठ्या मनाचा अभिनेता! क्रू मेंबर्सवर खुश होऊन अल्लू अर्जुनने दिले सोन्याचे ‘हे’ गिफ्ट, घ्या जाणून

मोठ्या मनाचा अभिनेता! क्रू मेंबर्सवर खुश होऊन अल्लू अर्जुनने दिले सोन्याचे ‘हे’ गिफ्ट, घ्या जाणून

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचे अनेक चाहते तसेच कलाकार ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनचे कौतुक करत आहे. अशातच त्याने असे काही केले आहे, ज्यामुळे त्याच्या चित्रपटाची टीम त्याच्यावर खुश आहे.

अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटाच्या क्रूमेंबरला १०-१० ग्रॅमची सोन्याची अंगठी गिफ्ट दिली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील समीक्षक आणि लेखक मनोबाला विजय बालन यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. (Actor allu arjun gifts of his weighing 10 grams to crew members of his movie pushpa)

माध्यमांतील वृत्तांनुसार, अल्लू अर्जुन खूप खुश आहे की, चित्रपटाची शूटिंग अगदी आरामात पूर्ण झाली आहे. या चित्रपटात एक गाणे देखील आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना असे वाटत होते की, या गाण्याची शूटिंग लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली पाहिजे. जेव्हा असे झाले, तेव्हा अल्लू अर्जुन खूप खुश झाला.

या खास गाण्यात अभिनेत्री समंथा रुथ प्रभू दिसणार आहे. या गाण्यात अल्लू अर्जुन आणि तिची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. समंथाच्या करिअरमधील एक पहिले खास गाणे आहे, जे लवकरच प्रदर्शित केले जाणार आहे.

‘पुष्पा’ हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही मागील काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. तिचे आणि अभिनेता नागा चैतन्य याच्या घटस्फोटामुळे ते माध्यमांमध्ये झळकत होते. सन २०१७ मध्ये त्या दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या ४ वर्षानंतर म्हणजेच २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे.

हेही वाचा-

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा