Saturday, June 29, 2024

हे चित्रपट घालणार जानेवारी 2023मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, एकदा पाहाच

2022 हे वर्ष बॉलीवूड चित्रपटांसाठी काही खास नव्हते, कारण 2022 मध्ये बॉलीवूडचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले, परंतु साऊथ चित्रपटांकडून शिकून बॉलीवूडने 2023साठी जबरदस्त तयारी केली आहे. या तयारीमध्ये, शाहरुख खानच्या ‘पठाण’पासून ‘टायगर 3’ पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी एक यादी तयार केली आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांव्यतिरिक्त, या यादीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांचाही समावेश आहे.

पठाण
पठाण (Pathan) हा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आगामी चित्रपट आहे, ज्यामध्ये तुम्हाला जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसतील, किंग खान व्यतिरिक्त, हा एक अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट असणार आहे ज्याची कथा पठाणभोवती फिरणार आहे, आता पठाण कोण आहे? आणि तो काय करणार आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. पठाण 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कुत्ते
वर्षाच्या सुरुवातीला बॉलीवूडचा मल्टीस्टारर चित्रपट ‘कुत्ते’ (Kuttey) रिलीज होणार आहे. ही कथा क्राईम थ्रिलरवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये बरेच अॅक्शन सिन्स देखील जोडण्यात आली आहे. हा सिनेमा सात लोकांच्या आयुष्यावर भाष्य करतो. हे सात जण एका गोष्टीची प्रतीक्षा करतात. आता ती गोष्ट नक्की काय असेल हे प्रेक्षकांना सिनेमातच कळेल. कुत्ते या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश भारद्वाज यांनी केले आहे. भूषण कुमार यांच्या कंपनी टी सीरीजखाली याची निर्मिती करण्यात आली आहे. ‘कुत्ते’ हा सिनेमा 13 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

लकडबग्घा
लकडबग्घा (Lakadbaggha) हा एक आगामी बॉलीवूड अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यात रिद्धी डोंगरा आणि अंशुमन झा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा अर्जुन बक्षी नावाच्या एका चौकीदाराभोवती लिहिली गेली आहे, ज्याचे प्राण्यांवर खूप प्रेम असते, पण कोलकाता बंदरातून बेकायदेशीरपणे प्राणी बाहेर पाठवले जात असल्याची माहिती त्या मिळाल्यावर या प्राण्यांना वाचवण्याचा तो प्रयत्न करतो. लकडबग्घा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रदर्शित होईल.

मिशन मजनू
मिशन मजनू (Mission majnu) 2023 साली OTT वर प्रदर्शित होणारा हा पहिला बॉलीवूड चित्रपट आहे, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिकेत या चित्रपटात दिसतील. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे ज्याची कथा काही वास्तविक घडलेल्या घटनांपासून प्रेरित होऊन लिहिली गेली आहे. 1970 च्या दशकातील एक गुप्तचर पाकिस्तानमधील भारताच्या सर्वात धाडसी गुप्त मिशनला कसे चालवतो हे या चित्रपटात आपल्याला कळेल. मिशन मजनू हा सिनेमा 20 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

गांधी-गोडसे एक युद्ध
‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) हा एक आगामी बॉलीवूड ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत तर महात्मा गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता दीपक अंतानी दिसणार आहेत. गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा 25 जानेवारीला प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या शोमधून ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीची एक्सिट
ठरलं तर! ‘या’ दरम्यान पार पडणार 21वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव140 सिनेमांचा समावेश

हे देखील वाचा