Sunday, April 14, 2024

शाहरुखच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! ‘किंग खान’ला झाले इन्फेक्शन, फक्त भात खाऊन काढतोय दिवस

पठाण‘ या सिनेमामुळे देशभरात चर्चेत असलेला ‘किंग खान’ म्हणजेच सुपरस्टार शाहरुख खान याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. शाहरुख खानची तब्येत बिघडली आहे. शनिवारी (दि. 17 डिसेंबर) सोशल मीडियावरील Ask Me Anything या सेशनदरम्यान शाहरुख खानला इन्फेक्शन झाले असल्याचे समोर आले. चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना स्वत: शाहरुखने याबाबत खुलासा केला आहे. यासाठी शाहरुख खास पथ्य पाळत आहे.

शाहरुख खानला इन्फेक्शन
या सेशनदरम्यान एका व्यक्तीने शाहरुख खान (Shahrukh Khan) याला त्याच्या जेवणाच्या पथ्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेता म्हणाला की, “मी इन्फेक्शनमुळे थोडा आजारी आहे. त्यामुळे सध्या भात खात आहे.”

चाहते चिंतेत
शाहरुख खानने असे सांगताच चाहत्यांचीही चिंता वाढली आहे. नेटकरी एकापाठोपाठ एक अशा कमेंट करत शाहरुख लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. असे असले, तरीही शाहरुखने त्याच्या ट्वीटमध्ये त्याला कशाचे आणि कसले इन्फेक्शन झाले आहे, याचा उल्लेख केला नाहीये. या इन्फेक्शनपासून बरे होण्यासाठी शाहरुख साधा आहार घेत आहे.

‘पठाण’विषयी काय म्हणाला शाहरुख?
या सेशनदरम्यान शाहरुखने फीफा विश्वचषक 2022, आयपीएल सामना आणि ‘पठाण’ सिनेमाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने ‘पठाण’च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयीही चर्चा केली. चाहत्याने त्याला विचारले की, “पठाणच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन किती असेल?” त्याने यावेळी सांगितले की, “मी अंदाज बांधण्याच्या फंदात पडत नाही. मी तुमचे मनोरंजन करायला आणि तुम्हाला हसवायला आवडते.”

या सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे पहिले गाणे रिलीज झाले आहे. यामध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खानच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या गाण्यात दीपिकाने नारंगी रंगाची बिकिनी घातल्यामुळे चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. अशात शाहरुखने हादेखील खुलासा केला आहे की, या सिनेमातील दुसरे गाणे अरिजीत सिंग (Arijit Singh) याने गायले आहे.

कधी रिलीज होणार पठाण?
‘पठाण’ सिनेमाचा ट्रेलर लवकरच रिलीज केला जाईल. शाहरुखच्या पठाण सिनेमाच्या रिलीजविषयी बोलायचं झालं, तर हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमातून शाहरुख 4 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. यापूर्वी त्याने 2018 साली ‘झिरो’ या सिनेमात काम केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

शाहरुखच्या खात्यात ‘पठाण’व्यतिरिक्त ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे दोन सिनेमेही आहेत. या सिनेमांकडेही चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटाच्या पोस्टरवर झाला मोठा वाद, रिचा चढ्ढाची जीभ कापणाऱ्या बक्षीस जाहीर
देवोलीनाच्या लग्नाला भावाची नव्हती संमती? पाेस्ट शेअर करत म्हणाला, ‘नाते का यशस्वी होत नाही…’

हे देखील वाचा