Saturday, June 15, 2024

टीव्ही शो ‘मीत’च्या सेटवर लागली आग, खोली पूर्णपणे जळून खाक, आशी सिंगने दिली माेठे अपडेट

‘मीत: बदलेगी दुनिया की रीत’ या टीव्ही शोच्या सेटवर अचानक आग लागल्याने सर्वजण हादरले आहेत. अशा परिस्थितीत शोची अभिनेत्री आशी सिंगने आग कशी लागली याबद्दल सांगितले. मीरा रोड येथील शोच्या सेटला लागलेल्या आगीबाबत माहिती देताना अभिनेत्रीने आग लागण्याचे मुख्य कारण सांगितले. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तानुसार, सेटवरील एका खोलीच्या एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाला, ज्यामुळे सेटला आग लागली. अशात ती खोली पूर्णपणे जळून खाक झाली आहे, त्यामुळे तेथे ठेवलेले कॅमेरे व इतर उपकरणे वेळीच बाहेर काढण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती समाेर आली आहे. याशिवाय शॉर्ट सर्किटचे मूळ कारण शोधण्यासाठी सध्या तपास सुरू आहे, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.

अशा परिस्थितीत आशी सिंग म्हणाली, ‘सेटवरील लोक ठीक आहेत. एक छोटीशी आग लागली ती फक्त एका खोलीत बंदिस्त होती. त्या खोलीचा एसी नीट काम करत नव्हता. प्रत्येकजण सुरक्षित आहे. कारण, त्या खोलीत कोणीही नव्हते. सर्वजण सेटवर होते आणि आम्ही शूटिंगही पुन्हा सुरू केले आहे. आता सर्व काही चांगले आणि सुरक्षित आहे. काळजी करण्यासारखे काही नाही.’

मीतबद्दल बाेलायचे झाले तर, मीत हुड्डाने चीकूला अपहरणकर्त्यांपासून कसे वाचवले हे शोमध्ये दाखवण्यात आले होते. मीत आता तिच्या मुलाला अमेरिकेत जाण्यापासून रोखू शकेल का? ते या शोमध्ये जाणून घेणे खूप मनोरंजक आहे.(fire broke out on the set of tv show meet actress ashi singh gave a big update about the set)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
B’day Special | जेनिफर विंगेटचे ‘हे’ पाच बोल्ड लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

“व्यक्तीरेखेचा खून केला होता…” किरण माने यांनी त्यांच्या ‘त्या’ वादावर आधारित शेअर केली सूचक पोस्ट

हे देखील वाचा