मराठीत सिनेसृष्टीतील सर्वात अजरामर चित्रपटांची यादी काढली तर त्यातील टॉप ५ मध्ये एका चित्रपटाचं नाव नक्की असेल तो म्हणजे अशी ही बनवा बनवी! या चित्रपटानं तर कमाईचे रेकॉर्डच ब्रेक केले होते. १९८८ साली आलेल्या या सिनेमाने तब्बल ३ कोटींची कमाई केली होती. १९६६साली आलेल्या हृषीकेश मुखर्जी यांच्या बिवी और मकान या सिनेमाचा रिमेक असलेल्या या सिनेमात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सिद्धार्थ रे या चौघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आज या चौघांपैकी फक्त दोघेच कलाकार हयात आहेत.
लक्ष्या डिसेंबर २००४ मध्ये आपल्या सर्वांना सोडून गेला ते सर्वांच्याच लक्षात आहे परंतु चौथा कलाकार सिद्धार्थ रेदेखील त्याच वर्षी मार्च मध्ये निवर्तले हे फारसं कुणाला काही ठाऊक नाही. आज सिद्धार्थ रे यांच्याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Oh crap!! I watched it thinking it’s Siddharth Ray https://t.co/MwEKKoG4zV pic.twitter.com/u5ImujOOiT
— Mogambo ➐ (@ChoteMaalik) November 24, 2020
90च्या दशकातील हिट चित्रपट ‘बाजीगर’ मधले ‘छुपाना भी नहीं आता’ हे गाणे आजही आवडीने ऐकले जाते. गाणे ऐकताना या गाण्यात दिसणारा अभिनेता सिद्धार्थ रे तुम्हाला नक्कीच आठवेल. चित्रपटात त्याने काजोलचा मित्र आणि इंस्पेक्टर करण सक्सेनाची भूमिका साकारली होती. त्याच्यावर चित्रित केलेले हे गाणे प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले होते. तरी त्याच्या आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. तर चला आज फ्लॅशबॅक कथेत आपण सिद्धार्थ रेशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
Sudesh berry and siddharth ray debuted with 1992 hit Vansh. Despite no backing these movie was among top 20 grossers of year but alas both were not sons of veeru devgan and salim khan that they will get roles even after 8 flops. Nepo gang ensured their career as lead is over pic.twitter.com/GaYoLdktkC
— ՏᕼᗩIᒪᗴՏᕼ (@shaileshgam) June 19, 2020
सिद्धार्थ रेचा जन्म मुंबईतील मराठी-जैन कुटुंबात झाला. व्ही. शांताराम त्याचे आजोबा होते, जे निर्माता-दिग्दर्शक, अभिनेते व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते. सिद्धार्थला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायचे होते. व्ही शांताराम यांनासुद्धा लवकरच कळाले की अभिनेता होण्यासाठी त्याच्याकडे भरपूर कौशल्य आहे.
व्ही शांताराम यांनी 1977 मध्ये ‘चानी’ हा मराठी चित्रपट बनविला, ज्यात सिद्धार्थने पहिल्यांदा अभिनय केला होता. यानंतर सिद्धार्थला मराठी चित्रपटांमध्ये तर काम मिळाले पण हिंदी चित्रपटांसाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. 1980 मध्ये सिद्धार्थने आपला पहिला हिंदी चित्रपट ‘थोडी सी बेवफाई’ केला. यात शबाना आझमी आणि राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते, तर सिद्धार्थ आणि पद्मिनी कोल्हापुरे किशोरवयीन जोडप्याच्या भूमिकेत होते.
#अशी_ही_बनवाबनवी ची ३१ वर्ष पूर्ण#AshiHiBanvaBanvi #अशोक_सराफ #AshokSaraf #लक्ष्मीकांत_बेर्डे #LaxmikantBerde #सचिन_पिळगावकर #SachinPilgaonkar #सिद्धार्थ_राय #SiddharthRay @MarathiCineyug @RajshriMarathi @MarathiSanmaan #म #मराठी #मराठी_चित्रपट #AllTimeFavourite ???????????????????????????????? pic.twitter.com/lS8ynqBdBR
— गणेश स. शिंदे Ganesh S. Shinde (गजु) (@migajushinde) September 23, 2019
सिद्धार्थचे खरे नाव सुशांत रे होते परंतु हिंदी चित्रपटांत पदार्पण करण्यापूर्वी त्याने त्याचे नाव बदलले. त्यानंतर त्याने ‘गंगा का वचन’, ‘वंश’, ‘युध्दपथ’, ‘परवाने’, ‘बाजीगर’, ‘मिलिट्री राज’, ‘बिच्छू’, ‘पिता’, ‘जानी दुश्मन: एक अनोखी प्रेम कहानी’ आणि ‘चरस: अ ज्वॉइंट ऑपरेशन’ असे चित्रपट केले.
सिद्धार्थ रे यांनी १९९९ मध्ये सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री भानुप्रिया यांची लहान बहीण शांतीप्रिया यांच्याशी विवाह केला. शांतीप्रिया यांनी दाक्षिणात्य सिनेमाबरोबरच हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलं. तसेच गेल्या काही काळापासून त्या हिंदी मालिका क्षेत्रातही काम करत आहेत.
शांतीप्रिया यांनी अक्षय कुमार सोबत सौगंध चित्रपटात तर मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत फुल और अंगार या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. या दोघांनीही लग्न केल्यावर त्यांना शुभम आणि शिष्य ही दोन मुलं झाली. यानंतर सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक २००४ साली सिद्धार्थ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी अकाली निधन झालं.
यानंतर मोठ्या हिंमतीने अभिनेत्री शांतीप्रिया यांनी त्यांची मुलं शुभम आणि शिष्य यांचं पालन पोषण केलं. त्यांना शिक्षण दिलं. यासोबतच आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्या हिंदी मालिकांमध्ये कामं केली. त्यांनी विश्वामित्र, आर्यमान, माता की चौकी, द्वारकाधीश या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…