प्रसिद्ध सेलिब्रिटी हे नेहमीच सामान्य लोकांप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी फेरफटका मारताना दिसतात. अनेकांना ते ओळखू येत नाहीत, पण त्यांच्यावर नजर ठेवून असणाऱ्या पॅपराजींच्या कॅमेऱ्यापासून ते वाचत नाहीत. ते त्यांच्या कॅमेऱ्यात हमखास कैद होतात. आताही एक प्रसिद्ध जोडपं फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलं असता, पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ते प्रसिद्ध जोडपं इतर कुणी नसून भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आहेत.
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये ते दोघेही स्कूटरवर फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यांना असे पाहून चाहत्यांना मोह आवरता आला नाही. त्यांच्या व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
विराट पत्नी अनुष्कासोबत स्कूटरवर मुंबईत फिरताना दिसला. दोघांनी चाहत्यांना त्यांची ओळख पटू नये यासाठी काळ्या रंगाचे हेल्मेट परिधान केले होते. मात्र, तरीही चाहत्यांनी त्यांना ओळखलेच. त्यानंतर विराट आणि अनुष्काचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून असे वाटते की, विराट आणि अनुष्का शूटिंगसाठी स्कूटरवरून गेले होते.
Virat Kohli and Anushka Sharma riding scooter in Mumbai rode after a ad photoshoot. pic.twitter.com/zpS2v5FB8c
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 20, 2022
यापूर्वी अनुष्काने मागील काही दिवसांपूर्वी विराटसोबतचा फोटो शेअर केला होता. विराट आणि अनुष्का या फोटोत मस्तीच्या मूडमध्ये दिसले होते. यामध्ये त्यांचे जॅकेट आणि टी शर्ट एकाच रंगाचा होता. विराट आणि अनुष्काने रॉकस्टारप्रमाणे पोझ दिली होती. अनुष्काने हा फोटो शेअर करत विराटला ‘क्यूट मुलगा’ म्हटले होते. तिने लिहिले होते की, “मला नेहमीच एका क्यूट मुलासोबत बँड सुरू करायचा होता.”
View this post on Instagram
दोघेही नुकतेच विमानतळावर दिसले होते. त्यावेळी विराटने फोटो काढणाऱ्यांना मुलगी वामिकापासून दूर राहण्यास सांगितले होते. त्याच्या मुलीचे फोटो कुणीही व्हायरल करू नये, यासाठी तो कुणालाही फोटो काढू देत नव्हता. याबाबत त्याने सोशल मीडियावरही अनेकदा वक्तव्य केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणबीरशी लग्न करून ४ महिने होताच, आलिया घेणार ‘हा’ मोठा निर्णय; कशी असेल सासूबाईंची रिऍक्शन?
बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाणाऱ्या सिनेमांवर स्पष्टच बोलला अक्षय कुमार; म्हणाला, ‘सगळी चूक माझीच’
श्रद्धाचे मनमोहक फोटो पाहून बोल्ड अभिनेत्रींनाही जाल विसरून, खूपच सुंदर दिसतेय ‘चिरकुट’