‘आयुष्य किती नाजूक आहे…’, म्हणत सिद्धार्थच्या निधनावर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले दु:ख

टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी (२ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही बातमी सर्वांसाठी धक्कादायक आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांकडून आणि सर्व कलाकारांकडून त्याला श्रद्धांजली वाहिली जात आहे. सिद्धार्थचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले. सिद्धार्थच्या निधनाने फक्त अभिनय क्षेत्रच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वीरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली आहे. सेहवागने ट्वीट केले की, “आयुष्य किती नाजूक आहे, याचे आणखी एक उदाहरण. #सिद्धार्थ शुक्ला यांचे कुटुंब आणि मित्रांना माझ्या संवेदना. ओम शांती.”

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. सिद्धार्थ ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो ‘झलक दिखला जा ६’, ‘फियर फॅक्टर- खतरों के खिलाडी’ आणि ‘बिग बॉस १३’ सारख्या शो मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. सिद्धार्थ हा ‘बिग बॉस १३’ विजेता होता. त्याने ‘हम्प्टी शर्मा के दुल्हनिया’ या चित्रपटातही काम केले होते.

सिद्धार्थ नुकताच एकता कपूरच्या ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ या लोकप्रिय सीरिजमध्ये शेवटचा दिसला होता. यात त्याने अगस्त्यची भूमिका साकारली होती. (Former cricketer pays homage to late actor Siddharth Shukla)

सिद्धार्थला ‘बालिका वधू’ या टीव्ही मालिकेतून टीव्ही जगात आपली नवीन ओळख मिळाली. या मालिकेत त्याने आयएएस अधिकारी शिवराज सिंग शेखरची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळेच त्याला चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळाले. शोदरम्यान त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचेही सन २०२० मध्ये निधन झाले होते. १४ जून रोजी मुंबईतील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत सुशांत आढळला होता. एक वर्ष झाले, पण देशाला अजूनही दिवंगत सुशांतची उणीव अजूनही भासत आहे. त्यानंतर आता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ शुक्ला शहनाज गिलसोबत ‘बिग बॉस ओटीटी’ आणि ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

सिद्धार्थ शुक्लाची चटका लावणारी एक्झिट; मॉडेलिंगने मिळाली होती आयुष्याला कलाटणी, जाणून घ्या त्याचा प्रवास

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

-सिद्धार्थ शुक्ला आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमागील ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचा विषय