याला म्हणतात नशिबवान! असे कलाकार ज्यांचं पहिलं प्रेमच झालं त्यांचं जीवनसाथी, लग्न करुन आयुष्यभर दिली साथ


नुकतेच वरुण धवनने नताशा दलालसोबत लगीनगाठ बांधली आहे. अलिबागमध्ये या दोघांनी खाजगी समारंभात लग्न केले. वरुण आणि नताशा हे लहानपणीचे मित्र होते. शालेय जीवनात सुरु झालेलं या दोघांचे हे प्रेम वेळ आणि काळानुसार वाढत गेले आणि आज ते एका सुंदर नात्यात बांधले गेले.

असे खूप कमी वेळा होते की एखाद्या व्यक्तीचे लग्न त्याच्या पहिल्या प्रेमासोबत होते. असे म्हणतात की, माणूस कितीही मोठा झाला तरी तो त्याचे पहिले प्रेम कधीच विसरू शकत नाही. पहिले प्रेम ते पहले प्रेमच असते. त्यात काळ आणि वेळेनुसार प्रेम कमी होत नाही. आपले पहिले प्रेमच जर आपला आयुष्यभराचा जीवनसाथी बनत असेल तर त्यासारखे स्वर्गसुख नाही. पण हे सुख प्रत्येकाच्याच नशिबी असेल असे नाही. मात्र असे काही नशीबवान कलाकार बॉलीवूडमध्ये नक्कीच आहे ज्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेमालाच आपला जीवासाठी बनवले. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही कलाकाराची नावे.

शाहरुख खान :
या नशीबवान लोकांपैकी पहिला आहे किंग खान शाहरुख खान. आपल्या अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनावर बादशाहात गाजवणाऱ्या शाहरुख खानने त्याच्या पहिल्या प्रेमासोबतच लग्न केले आहे. गौरी छिब्बर हे शाहरुखच्या प्रेमाचे नाव. १९८४ साली दिल्लीच्या पंचशील नगरमध्ये एका पार्टीत १९ वर्षाच्या शाहरुखची १४ वर्षाच्या गौरीवर नजर पडली आणि तो तिच्या प्रेमात वेडा झाला. नंतर काही गाठीभेटी झाल्या आणि १९९१ मध्ये या दोघांनी लग्न केले. आज हे कपल आर्यन, सुहाना आणि अबराम या तीन मुलांचे आई, वडील आहेत.

आयुष्मान खुराणा :
आयुष्मानने देखील त्याच्या शाळेच्या मैत्रिणींसोबतच लग्न केले आहे. ताहिरा कश्यप असे त्याच्या पत्नीचे नाव असून त्याची पहिली भेट जेव्हा ताहिरा १६ वर्षाची होती तेव्हा झाली. या दोघांचे कुटुंब देखील एकमेकांना ओळखत होते. १२ वर्षाच्या ओळखीनंतर या दोघांनी २०११ साली लग्न केले. ताहिरा आयुष्मानसाठी खूपच लकी ठरली. या लग्नानंतरच आयुष्मानचे नशीब बदलले आणि तो बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरला. आज या दोघांना दोन मुलं आहेत.

ऋतिक रोशन :
ऋतिक १२ वर्षाचा असताना शेजारी राहणाऱ्या सुझान खानच्या प्रेमात पडला. सुझानसुद्धा याच इंडस्ट्रीच्या परिवाराशी संबंधित होती. सुझानही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. मात्र ऋतिक त्याच्या मनातील भावना कधीच सुझान समोर वक्ता करू शकला नाही. जसा काळ गेला तसे हे दोघे आपापल्या आयुष्यात पुढे गेले. मात्र ऋतिकचे प्रेम जसेच्या तसेच होते. त्यानंतर काही काळाने यांच्या भेटी सुरु झाल्या आणि त्यांनी २००० लग्न केले. त्या दोघांना दोन मुले देखील झाली. मात्र २०१३ साली लग्नाच्या १७ वर्षांनी या दोघांनी घटस्फोट घेतला.

सुनील शेट्टी :
बॉलीवूडमध्ये ‘आण्णा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सुनील शेट्टी देखील याबाबतीत लकी ठरला. त्याने देखील त्याच्या पहिल्या प्रेमासोबतच लग्न केले. त्याच्या बायकोचे नाव आहे माना शेट्टी. सुनीलने मानाला एका पेस्ट्री शॉपवर पाहिले होते. पाहताचक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर मैत्री आणि मग लग्न. पण या दोघांचे लग्न होणे खूप अवघड होते, कारण माना मुस्लिम तर सुनील कर्नाटकचा बंट समुदायातला होता. मात्र ९ वर्ष सतत प्रयत्न करून त्यांना यश मिळाले आणि हे दोघे विवाहबंधांत अडकले.


Leave A Reply

Your email address will not be published.