देश कोरोना विषाणूच्या विळख्यातून सावरत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. ही परिस्थिती पाहता शासनाने चित्रपटगृहे खुली करण्याचा निर्णय घेतला होता. आता ओटीटी प्लॅटफॉर्मसोबतच चित्रपटगृहांमध्येही चित्रपट प्रदर्शित करण्याचे मार्ग खुले झाल्यामुळे निर्माते एकामागोमाग धूमधडाक्यात चित्रपट प्रदर्शित करत आहेत. मनोरंजन विश्वात दर आठवड्याला काही ना काही खास प्रेक्षकांसाठी येत आहे. असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहेत. जिथून तुम्ही घरी बसून निवांतपणे चित्रपट आणि वेबसीरिजचा आनंद घेऊ शकता. या आठवड्यातही अनेक चित्रपट आणि मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहेत. आपण त्यांची संपूर्ण यादी पाहूया…
स्पेशल ऑप्स १.५- डिझनी प्लस हॉटस्टार
स्पाय थ्रिलर सीरिज ‘स्पेशल ऑप्स’ २०२० मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, निर्माते नीरज पांडे स्पेशल ऑप्स १.५ घेऊन येत आहेत. हिम्मत सिंगच्या गुप्तहेराची कथा या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. के के मेनन हिम्मत सिंगची भूमिका साकारत आहेत. ही मालिका १२ नोव्हेंबरला डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. यात आफताब शिवदासानीही मुख्य भूमिकेत आहे.
रेड नोटिस- नेटफ्लिक्स
ड्वेन जॉन्सन, रायन रेनॉल्ड्स आणि गॅल गॅडोट अभिनित ‘रेड नोटिस’ हा चित्रपट फार कमी ठिकाणी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता हा चित्रपट १२ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा एक ऍक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एका चोरीभोवती फिरते. ज्यामध्ये हे तीन टॉप स्टार्स एकमेकांशी भांडताना दिसणार आहेत. हा या वर्षातील बहुप्रतिक्षित हॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे.
स्क्वॉड- झी ५
डॅनी डेन्झोंगपाचा मुलगा रिंजिंग डेन्झोंगपाचा पदार्पण चित्रपट ‘स्क्वॉड’ १२ नोव्हेंबर रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. निलेश सहाय दिग्दर्शित हा एक पूर्ण ऍक्शन चित्रपट असून, त्यातून मालविका राज देखील पदार्पण करत आहे.
मुगीज- नेटफ्लिक्स
‘मुगीज’ हा एक तमिळ चित्रपट आहे, ज्याची निर्मिती विजय सेतुपती करत आहे आणि या चित्रपटात तो देखील अभिनय करताना दिसणार आहे.
यात विजयची मुलगी सीराजा सेतुपतीही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जड आवाजामुळे वर्गातून हाकलले जायचे, नंतर त्याच आवाजाने दिली खरी ओळख; वाचा पॉप क्वीन उषा उत्थुपबद्दल