सध्या मराठी चित्रपट जगतात अनेक नाविण्यपूर्ण चित्रपट आणि कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट जगताचे हे नवे बदलते रुप सर्वांनाच मोहित करत आहे. मराठी सिनेसृष्टीत सध्या नाविण्यपूर्ण कथा तर येतंच आहेत त्याचसोबत आता चित्रपटात नाविण्यपूर्ण प्रयोगही करण्यात येत आहेत. आता मराठी चित्रपट जगतात पहिल्यांदाच अंडर वॉटर शूट केलेला सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याआधी असे प्रयोग फक्त हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये केले आहेत. ‘गडद’ चित्रपटामध्ये हा प्रयोग पहिल्यांदा केला जाणार आहे यासंबधीचे चित्रपटाचे समोर आले आहे.
अभिनेत्री मिताली मयेकरने (Mitali Mayekar) तिच्या आगामी गडद चित्रपटाचे भन्नाट पोस्टर नुकतेच लॉंच केले आहे. यावेळी चित्रपटातील सगळे कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक उपस्थित होते. गडद हा दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांचा पहिलाच चित्रपट आहे, तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले आहे. इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद’च्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग गोव्यामध्ये होणार आहे. ‘गडद’ चित्रपटात पहिल्यांदाच पाण्याखालच्या शूटिंगचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये स्कूबा डायविंगचा चित्रपटात सीन दाखवण्यात येणार आहे. या पोस्टरवरुन तर चित्रपटात प्रेक्षकांना नवीनच अनुभती मिळणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान या चित्रपटाचा पोस्टर दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. मंदार लालगे आणि नितीन गावंडे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर असून, प्रवीण वानखेडे कार्यकारी निर्माते आहेत. अभिषेक खणकर यांनी ‘गडद’साठी गीतलेखन केलं असून, आदिनाथ पोहनकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. कॅास्च्युम किरण बुराडे यांनी केले आहेत. अभिनेत्री मिताली मयेकर सुयोग गोऱ्हे, शुभांगी तांबाळे, नितीन गावंडे, आरती शिंदे आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. संगीत रोहित श्याम राऊतचं आहे, तर सिनेमॅटोग्राफी वेंकटेश प्रसाद करणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-