‘रंगीत खडूच्या रंगछटा’, म्हणत मिताली मयेकरने केला केले सुंदर फोटो शेअर


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. त्यांनी आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तसेच यासाठी त्यांना खूप काळ लागला या आहे. परंतु, अगदी कमी कालावधीत आपलं नाव कमावणाऱ्या अभिनेत्री अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या आहेत. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर. मितालीने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून काही जास्त काळ लोटला नाही. पण तरी देखील आज ती खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. अवघ्या २४ वर्षाच्या मितालीने तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिच्या चाहत्यांसाठी तिने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

मितालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाचा सुंदर असा लॉन्ग ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने इतर कोणतीही ज्वेलरी घातली नाही, तिने केवळ गुलाबी रंगाची बिंदी लावली आहे. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. ती या ड्रेससोबत वेगवेगळ्या पोझ देत आहे. (mitali mayekar share her beautiful photos on social media)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “रंगीत खडूच्या रंगछटा.” तिचा हा सुंदर आणि खास अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देऊन तिच्या या सुंदर लूकचे कौतुक केले आहे.

मिताली मयेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. तिने याच वर्षी तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले आहे. तो देखील एक अभिनेता आहे. तो सध्या स्टार प्रवाहावरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करत आहे.

हेही वाचा :

तब्बल ४८ कोटीहून अधिक लोकांनी पाहिलाय १८ सेकंदाचा हा व्हिडिओ, काय आहे खास? तुम्हीच पाहा

बॉलिवूडवर भीतीचं सावट! कपूर घराण्यातील ‘या’ चार सदस्यांना झाला कोरोना

बोल्ड, ब्युटीफुल अँड बिनधास्त सई, नवीन फोटोंनी चोरले चाहत्यांचे मन

 


Latest Post

error: Content is protected !!