Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडवर शोककळा! ब्लॉकबस्टर सिनेमे बनवणाऱ्या निर्मात्याचं निधन, सुनेने दिली महत्त्वाची माहिती

बॉलिवूडवर शोककळा! ब्लॉकबस्टर सिनेमे बनवणाऱ्या निर्मात्याचं निधन, सुनेने दिली महत्त्वाची माहिती

बॉलिवूडमधून दु:खद बातमी समोर येत आहे. ‘गदर‘ हा ऑल टाईम ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचे वडील के. सी. शर्मा यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. शुक्रवारी (दि. १९ ऑगस्ट) रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना देवाज्ञा झाली. महत्त्वाचं म्हणजे, ते मागील बऱ्याच काळापासून आजारपणाशी लढा देत होते. मात्र, त्यांचा हा लढा शुक्रवारी थांबला. त्यांच्या निधनामुळे अनिल यांच्यासोबतच कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. चाहत्यांसोबतच कलाकारही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.

के. सी. शर्मा (K C Sharma) यांची सून सुमन शर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “ते दीर्घ काळापासून आजारी होती. ते स्मृतिभ्रंशाचेही रुग्ण होते. मागील काही वर्षांपासून त्यांना चालता-फिरताही येत नव्हते. काल रात्री, जवळपास ८ वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी त्यांच्या अंधेरी येथील घरातच शेवटचा श्वास घेतला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anilsharma (@anilsharma_dir)

सुमन यांनी सांगितले की, त्यांच्या सासऱ्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. शनिवारी (दि. २० ऑगस्ट) दुपारी त्यांच्यावर मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

के. सी. यांचे सिनेमे
के. सी. शर्मा यांनी ‘श्रद्धांजली’, ‘हुकूमत’, ‘तहलका’, ‘जवाब’, ‘ऐलान ए जंग’, ‘पुलिसवाला गुंडा’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ यांसारख्या अनेक हिट सिनेमांची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे, त्यांनी निर्मिती केलेल्या अधिकतर सिनेमांचे दिग्दर्शन हे त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीच केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anilsharma (@anilsharma_dir)

के. सी. शर्मा यांचे कुटुंब
के. सी. शर्मा यांना चार मुले आहेत. त्यामध्ये अनिल शर्मा, संजय शर्मा, कपिल शर्मा आणि अनुज शर्मा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांचा नातू उत्कर्ष शर्मा हा देखील बॉलिवूड अभिनेता आहे. त्याने ‘जीनियस’ या सिनेमात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘दीपवीर’ने अलिबागमध्ये खरेदी केले नवीन घर, ‘एवढे’ कोटी मोजत बनले मालक, गृहप्रवेशाची पूजा संपन्न
ट्रोलर बोलला आणि तिने खरंच करून दाखवलं, उर्फीचा लेटेस्ट व्हिडिओ जोरदार व्हायरल
जरा इकडं पाहा! प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय, ‘सेक्ससाठी पुरुषांची गरज नाही’, सर्वत्र रंगलीय चर्चा

हे देखील वाचा