Friday, April 19, 2024

‘दीपवीर’ने अलिबागमध्ये खरेदी केले नवीन घर, ‘एवढे’ कोटी मोजत बनले मालक, गृहप्रवेशाची पूजा संपन्न

अभिनेता रणवीर सिंग आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना बॉलिवूडमधील रोमँटिक जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडते. ते जिथे कुठे जातील, त्यांच्या मागे चाहत्यांचा गराडा लागलेला असतो. त्यांच्या आयुष्यात कोणतीही चांगली गोष्ट घडली की, चाहत्यांचा आनंद द्विगुणीत होत असतो. आताही चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होत असावा. कारण, या जोडप्याने नवीन घराची पूजा केली आहे. यादरम्यानचे फोटो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. आता हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचे नवीन घर हे अलिबाग येथे आहे. त्यांचे नवीन घर (Ranveer- Deepika New House) हे मुंबईपासून जवळपास ९० किमी दूर समुद्रकिनारी आहे. ही मालमत्ता रणवीर आणि दीपिकाने मागील वर्षी म्हणजेच २०२१मध्ये खरेदी केली होती.

तब्बल २२ कोटी रुपयांची आहे मालमत्ता
माध्यमांतील वृत्तांनुसार, रणवीर- दीपिका यांनी या मालमत्तेसाठी तब्बल २२ कोटी रुपये मोजले होते. याव्यतिरिक्त दोघांनीही या मालमत्तेसाठी तब्बल १.३२ कोटी रुपये स्टँप ड्युटी दिले होते. ही मालमत्ता अलिबागजवळ आहे. ही मालमत्ता १८००० स्क्वेअर फूट जागेत पसरली आहे. रणवीर आणि दीपिका यांनी ही मालमत्ता त्यांच्या आरएस वर्ल्डवाइड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि केए एंटरप्राईझ एलएलपी फर्मअंतर्गत खरेदी केली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, यापूर्वी जुलै २०२१मध्ये दीपिकाने बंगळुरू येथे एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. ही मालमत्तेचं सध्या काम सुरू आहे, याची किंमतही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

रणवीर आणि दीपिकाचे आगामी सिनेमे
अभिनेता रणवीर सिंग हा शेवटचा २०२२मधील ‘जयेशभाई जोरदार’ या सिनेमात झळकला होता. आता तो ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ आणि ‘तख्त’ यांसारख्या आगामी सिनेमात दिसणार आहे. दुसरीकडे, दीपिका पदुकोण ही शेवटची २०२२मधील ‘गेहराइयां’ या सिनेमात दिसली होती. आता ती आगामी ‘फायटर’, ‘पठाण’, ‘सर्कस’ यांसारख्या बहुप्रतिक्षित सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
ट्रोलर बोलला आणि तिने खरंच करून दाखवलं, उर्फीचा लेटेस्ट व्हिडिओ जोरदार व्हायरल
जरा इकडं पाहा! प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय, ‘सेक्ससाठी पुरुषांची गरज नाही’, सर्वत्र रंगलीय चर्चा
पन्नाशी पार केलेल्या अरबाजची ३० वर्षीय गर्लफ्रेंड आहे खूपच बोल्ड, व्हिडिओचा इंटरनेटवर नुसता धुमाकूळ

हे देखील वाचा