हीच आहे का ती ‘सावळ्या कुंभारा’ची ‘गंगी’? राजश्री लांडगेचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे


विनोदी चित्रपटांची यादी पाहिली, तर त्यात पहिलं नाव येतं ‘गाढवाचं लग्न’. मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे यांच्या विनोदी अभिनयाचे प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले. आजही जेव्हा टीव्हीवर हा चित्रपट लागतो, तेव्हा प्रेक्षक आवडीने ते बघतात. मकरंद अनासपुरे तर लोकप्रिय अभिनेता होतेच, मात्र अभिनेत्री राजश्री लांडगेला या चित्रपटाने अमाप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून दिली.

राजश्री लांडगेने चित्रपटात ‘गंगा’चे पात्र साकारले होते. जे प्रचंड गाजले. आजही तिचे डायलॉग प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ आहेत. राजश्रीने साधी सरळ गावरान गंगीची व्यक्तीरेखा अतिशय उत्कृष्टरीत्या साकारली. मात्र तुम्हाला माहिती का? चित्रपटातील गावरान गंगी खऱ्या आयुष्यात मात्र खूप स्टायलिश आहे. तिला मॉडर्न राहायला आवडते.

तिच्या या फोटोंवर एक नजर टाकली, तर तुम्हाला सहज लक्षात येईल की काळानुसार तिच्या रूपात किती फरक आला आहे. आता राजश्री खूप ग्लॅमरस राहते. ‘गाढवाचं लग्न’ शिवाय अभिनेत्री ‘सिटीझन्स’ मध्येही झळकली आहे. यात तिचे पात्र अतिशय ग्लॅमरस होते. याशिवाय ती ‘सत्ताधीश’ आणि ‘ती फुलराणी’ या चित्रपटातही झळकली आहे.

राजश्रीचा जन्म पुण्यात झाला आणि ती लहानाची मोठीही पुण्यातच. शिवाय तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देखील पुण्यातच झाले. कॉलेज पूर्ण केल्यानंतर ती तिचे अभिनयाचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईकडे वळाली. तिने मुंबईत येऊन बरेच थिएटर केले. त्यानंतर तिला २०१४ मध्ये ‘गाढवाचं लग्न’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ज्यातून ती खूप प्रसिद्ध झाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…

-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.