Saturday, May 11, 2024

पद्मश्री पुरस्कार सन्मानित संगितकार काळाच्या पडद्याआड, कलाविश्वात पसरली शोककळा

कलाविश्वातून नुकतंच एक दु:खद बातमी समोर येत आहे की, कर्नाटकची संस्कृती लोकप्रिय करणारे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित एचआर केशव मूर्ती यांचे बुधवार (दि, 22 डिसेंबर) रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. ते अनेक दिवसांपासून वायनुसार आजारांशी झुंज देत होते शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीएम बसवराज यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कर्नाटकची संस्कृती लोकप्रिय बनवण्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असणारे एआर केशव मूर्ति (H. R. Keshav Murti) यांचे बुधवारी शिवमोग्गा जिल्ह्यातमध्ये त्यांच्या राहत्याघरी त्यांनी शेवटाचा श्वास घेतला 89 वर्षाचे केशव मूर्ति हे अनेक आजाराशी झुंज देत होते. आता त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी राहात आहेत.

केशव मूर्ती यांचा जन्म गमाका कालारांच्या कुटुंबामध्ये झाला असून त्यांनी आपल्या वडीलांकडून गमका संगित संस्कृतीचे प्रशिक्षण घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशव मूर्ती याच्या निधनावर शोक व्यक्त करत ट्वीटरवर पोस्ट शेअर करत लिहेल आहे की, “गमका लोकप्रिय करण्यासाठी आणि कर्नाटकची अनोखी संस्कृती साजरी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी केशव मूर्ती नेहमीच स्मरणात राहतील. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी सल्ल्याबद्दलही ते स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.”

“राज्याच्या सांस्कृतिक परंपरांचे समर्थन करणाऱ्या विद्वानाच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले.” असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही मूर्ती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता गोविंदाचा या दिग्दर्शकाने केला होता घोर अपमान; म्हणाला, “ना हाईट, ना हिरोसारखं तोंड…”
दिशा पटानीच्या बोल्ड लूकने सोशल मीडियावर लावली आग, पाहाच व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा