Monday, May 20, 2024

नितेश तिवारीचा ‘रामायण’ सापडला कायद्याच्या कचाट्यात, चित्रपट रिलीझ होण्याआधीच होणार का रद्द?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि नितेश तिवारी यांचा आगामी चित्रपट ‘रामायण’ सतत चर्चेत असतो. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. हा चित्रपट कायदेशीर अडचणीत अडकल्याची बातमी समोर येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत. साऊथचा सुपरस्टार यश सहनिर्माता आहे. आता एका नव्या अहवालात ‘रामायण’ कायदेशीर अडचणींचा सामना करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘रामायण’चे प्राथमिक प्रोडक्शन हाऊस अल्लू मंटेना मीडिया व्हेंचर्स एलएलपी प्राइम फोकस टेक्नॉलॉजीज लिमिटेडसोबत कायदेशीर वाद असल्याचे बोलले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू मंटेना मीडिया व्हेंचर्स एलएलपी आणि प्राइम फोकस टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये ‘रामायण’च्या अधिकारांवर वाद सुरू आहेत. एप्रिल 2024 मध्ये त्यांनी यासाठी बोलणी सुरू केली. वृत्तानुसार, अपूर्ण पेमेंटमुळे अधिकार मिळविण्यासाठी वाटाघाटी अयशस्वी झाल्या.

अहवालात म्हटले आहे की अल्लू मंटेना मीडिया व्हेंचर्स एलएलपीचा दावा आहे की ‘रामायण’चे हक्क त्यांच्याकडेच राहतील. प्राइम फोकस टेक्नॉलॉजीज लिमिटेड किंवा कोणत्याही संस्थांद्वारे स्क्रिप्टचा कोणताही वापर त्यांच्या कॉपीराइटचे उल्लंघन होईल. प्राईम फोकस टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘रामायण’मध्ये कोणतेही अधिकार किंवा मालकी नसल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा मानसही प्रॉडक्शनने व्यक्त केला आहे.

या सगळ्यामुळे प्रकल्पाला विलंब होऊ शकतो, मात्र याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. या वृत्तांवर नितेश तिवारी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला यशने पुष्टी केली होती की तो रामायणमध्ये सह-निर्माता म्हणून सामील होणार आहे. यश एका संवादात म्हणाला होता, असे चित्रपट बनवण्याची माझी नेहमीच इच्छा होती. सर्वोत्कृष्ट VFX स्टुडिओपैकी एकाशी सहयोग करताना मला आनंद झाला. आम्ही अनेक प्रकल्पांचा विचार केला आणि या चर्चेदरम्यान ‘रामायण’चा प्रकल्प समोर आला.

यश म्हणाला, “रामायण माझ्याशी खूप घट्ट जोडलेले आहे. त्यासाठी माझी दृष्टी होती. ‘रामायण’ सह-निर्मितीसाठी सामील होऊन, आम्ही भारतीय चित्रपट बनवण्यासाठी आमची सामूहिक दृष्टी आणि अनुभव एकत्र आणत आहोत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

जस्टिन बीबर लवकरच करणार पहिल्या बाळाचे स्वागत, सोशल मीडियावर केली घोषणा
स्टरडम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल असा राखते दीपिका पदुकोण, जवळच्या व्यक्तीने केला खुलासा

हे देखील वाचा