Friday, March 29, 2024

अभिनेता गोविंदाचा या दिग्दर्शकाने केला होता घोर अपमान; म्हणाला, “ना हाईट, ना हिरोसारखं तोंड…”

बॉलिवूड अभिनेता गोविंदाला फक्त हिरो नंबर 1 असचं म्हटले जात नाही. गोविंदाने इंडस्ट्रीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. गोविंदा असाच एक अभिनेता आहे ज्याने बॉलिवूडमध्ये हिरोची व्याख्याच बदलून टाकली. जबरदस्त डान्स, जबरदस्त कॉमेडी आणि अ‍ॅक्शननेमुळे गोविंदा हिरोच्या नावावर एक फुल पॅकेज ठरला. त्यांच्या चाहत्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे. गोविंदाच्या दमदार अभिनयाचे आजही लोक वेडे आहेत. पण हे करण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे. चला तर जाणून घेऊया गोविंदाच्या संघर्षाच्या दिवसांपासूनचा असाचं काही किस्सा सांगणार आहेत.

नुकत्याच माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण करून देणारा एक किस्सा शेअर केला. गोविंदाने सांगितले होते की, त्या दिवसांत मी माझ्या अभिनयाची व्हिडिओ कॅसेट बनवली होती, त्यासोबतच मी रोशन तनेजा अ‍ॅक्टिंग इन्स्टिट्यूटलाही जॉईन झालो होतो. गोविंदाने सांगितले की, एके दिवशी मी माझी व्हिडिओ कॅसेट घेऊन दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांच्याकडे पोहोचलो होतो, मला पाहून त्यांनी मला नकार दिला होता आणि सांगितले होते की, यात ना उंची आहे, ना व्यक्तिमत्व, ना आवाज. ते म्हणाले होते की, आता अमिताभ बच्चनसारख्या उंचीच्या माणसांची गरज आहे.

जेव्हा गोविंदाचे घर पैशांअभावी विकले गेले
गोविंदाने सांगितले की, असे बोलून तो खूप दुःखी झाला होता, पण हिरो बनण्याची इच्छा आणखीनच प्रबळ झाली होती. गोविंदाचे वडील अरुण आहुजा यांच्यासोबतही असेच काहीसे घडले आहे. गोविंदाचे वडीलही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. गोविंदाच्या वडिलांनी एकदा स्वतःचा चित्रपट तयार केला होता, ज्यामध्ये त्यांनी सर्व पैसे गुंतवले होते पण तो चित्रपट फ्लॉप झाला.

चित्रपट फ्लॉप झाल्याने गोविंदाच्या वडिलांचे मोठे नुकसान झाले, त्यानंतर त्यांचे घर विकले गेले. गोविंदाचे वडील आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांचा बंगला सोडून इतरत्र राहण्यास भाग पाडले. गोविंदा त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. आईचा त्रास बघून गोविंदाने काहीतरी करायचे ठरवले.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘छोटो मियाँ बडे मियाँ’च्या वेळी अमिताभ बच्चनला खूप घाबरला होता गोविंदा, कारण जाणून व्हाल थक्क
मृणाल ठाकूर राजस्थानमध्ये घालवतेय सुट्ट्या, अभिनेत्रीची कला पाहाच

हे देखील वाचा