Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

जेव्हा शूटिंग करतानाच ‘ही’ बोल्ड अभिनेत्री झालेली बेशुद्ध; इलेक्ट्रिक शॉक देऊन वाचवला होता तिचा जीव

‘गंदी बात’ फेम गेहना वसिष्ठ हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती मालिकांशिवाय काही चित्रपटांमध्येही दिसली आहे. गेहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे. अभिनेत्रीला पॉर्न फिल्म बनवल्या प्रकरणीही अटक करण्यात आली होती, पण तुम्हाला माहित आहे का गेहना पहिल्यांदा चर्चेत कधी आली होती?

झाले असे की, 2019मध्ये गेहना वसिष्ठ (Gehana Vasisth) हिला एका वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी तिला वाचवणं अवघड होतं. माध्यमांतील वृत्तांनुसार, गेहना काहीही न खाता 48 तास शूटिंग करत राहिली, ज्यामुळे ती सेटवर बेशुद्ध झाली होती. यादरम्यान गेहनाला रक्तदाब आणि स्ट्रोकमुळे हृदयविकाराचा झटका आला होता. इतकंच नाही, तर अभिनेत्रीचे पल्सही काम करत नव्हते. तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. तेथे उपस्थित लोकांनी गेहनाला मुंबईतील मालाड येथील डिफेन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यादरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते की, गेहनाचे पल्स पुन्हा सुरू होण्यासाठी दोन तास लागले. तसेच, तिला इलेक्ट्रिक शॉक द्यावा लागला होता.

त्यावेळी गेहना वसिष्ठ हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तासंतास आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान, ऑक्सिजन लेव्हल ठीक करण्यासाठी डॉक्टरांनी गेहनाला काही तासांसाठी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. गेहनाला मधुमेह आणि बीपीचा त्रास आहे. शूटिंगदरम्यान गेहना एनर्जी ड्रिंक्स आणि औषधे घेतल्यानंतरच शूटिंग करत होती, ज्याचा तिच्या शरीरावर वाईट परिणाम झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Er Gehana Vasisth (@gehana_vasisth)

गेहनाचा जन्म छत्तीसगडमधील चिरीमिरी येथे झाला. चिरीमिरी येथे सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर ती भोपाळला अभियांत्रिकी शिक्षणासाठी आली. इथे आल्यावर तिचे आयुष्यच बदलून गेले. ऑल सेंट्स कॉलेजमधून रोबोटिक्समध्ये इंजिनीअरिंग केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. माध्यमांतील वृतांनुसार, इंजिनीअरिंगदरम्यानच तिचा कल अभिनय आणि मॉडेलिंगकडे वळू लागला. यानंतर ती अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईकडे वळली. मोठी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गेहनाला इथे येऊन छोट्या भूमिका किंवा मॉडेलिंगच्या ऑफर्स घेऊन काम करावे लागले.

यानंतर ती साऊथच्या चित्रपटांमध्येही दिसायला लागली. या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, तिला बहुतेक अशाच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर मिळू लागल्या. यानंतर तिला ऍडल्ट वेब सीरिजच्या ऑफर्सही येऊ लागल्या आणि मग गेहनानेही कधी मागे वळून पाहिले नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुख अन् ‘थालापती’ने ऍटलीचा वाढदिवस बनवला खास; दिग्दर्शक म्हणाला, ‘माझे आधारस्तंभ…’
हिजाब वादादरम्यान मंदाना करीमीच्या पोस्टने वेधले लक्ष, प्रदर्शन करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ केला शेअर
सगळ्यात बाेल्ड भाेजपुरी गाण्याचा इंटरनेटवर राडा; माेनालिसा अन् पवनच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

हे देखील वाचा