Saturday, April 20, 2024

वाढदिवस विशेष | अभिनयात करिअर कारण्यासारही सोडले होते घर, पुढे अशी बनली गेहना वशिष्ट पॉर्नस्टार

मुंबईला स्वप्नांची नगरी म्हणतात. देशाच्या विविध भागातून हजारो मुली अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन येथे येतात. यापैकी फक्त काही स्वप्ने सत्यात उतरतात. या शहरात पाऊल ठेवल्यानंतरच त्यांना सत्याचा सामना करावा लागतो की, अभिनेत्री बनणे इतके सोपे नाही. मुंबईत चित्रपट किंवा टीव्ही मालिकांमध्ये छोट्याशा भूमिकेसाठी खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागते. याच कारणामुळे बहुतेक मुली त्यांची तुटलेली स्वप्ने घेऊन परत जातात किंवा प्रसिद्ध होण्यासाठी चुकीच्या मार्गावर जातात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी बॉलिवूडची टॉप हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आली होती, पण काही कारणांमुळे ती फक्त अॅडल्ट स्टार राहिली.

गेहना वशिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिचा जन्म छत्तीसगडमधील चिरीमिरी येथे झाला. गेहना दरवर्षी 16 जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करते. चिरीमिरी येथे सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर ती भोपाळला अभियांत्रिकी करण्यासाठी आली. इथे आल्यावर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. ऑल सेंट्स कॉलेजमधून रोबोटिक्समध्ये इंजिनीअरिंग केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिनीअरिंगदरम्यानच तिचा कल अभिनय आणि मॉडेलिंगकडे वळू लागला. यानंतर ती अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईकडे वळली. मोठी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या गेहनाला इथे येऊन छोट्या भूमिका किंवा मॉडेलिंगच्या ऑफर्स घेऊन काम करावे लागले.

मुंबईसारख्या महागड्या शहरात जगण्यासाठी खूप पैसा लागतो. कदाचित याच गरजांमुळे ती बॉलिवूडमधून बोल्ड चित्रपटांकडे वळली असावी. यानंतर ती साऊथच्या अॅडल्ट चित्रपटांमध्येही दिसायला लागली. या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, तिला बहुतेक अशाच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर मिळू लागल्या. यानंतर तिला अॅडल्ट वेब सीरिजच्या ऑफर्सही येऊ लागल्या. काळाच्या ओघात ती या दलदलीत गेली आणि नंतर तिने अश्लील चित्रपटांचे दिग्दर्शनही सुरू केले. या कुप्रसिद्ध रस्त्यांपर्यंत पोहोचल्यामुळे गेहना पुन्हा तिच्या घरी जाऊ शकली नाही. कुटुंबानेही तीच्याशी सर्व संबंध संपवले.

गेहनाप्रमाणेच अशा अनेक मुली आहेत, ज्या मुंबईत चित्रपटात नायिका बनण्यासाठी येतात. पण वेळ आणि परिस्थितीमुळे त्या काही औरच बनते. पैशाची कमतरता हे त्याचे सर्वात मोठे कारण मानले जाऊ शकते. छोटी शहरे सोडल्यानंतर मुली अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत पोहोचतात, पण कुटुंबाचा आधार घेणार्‍या मुली खूप कमी असतात. येथे बहुतांश मुलींना पैसे मिळवण्यासाठी स्वबळावर संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत कधी-कधी तिला त्या भूमिका कराव्या लागतात ज्या तिला करायच्या नाहीत.(gehana vasisth birthday how she became a bold film heroine know about her struggle career)

अधिक वाचा-
डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल
शाहरुख खानला महिला चाहतीने जबरदस्तीने केले किस; काय म्हणाले युजर वाचा एकदा

हे देखील वाचा