‘गंदी बात २’ फेम अन्वेशी जैनने पुन्हा केले चाहत्यांना घायाळ; पाहा निळ्या साडीतील विविध अदा


सध्या वेबसीरिजला सुगीचे दिवस आले आहेत. या वेबसीरिजमुळे अनेक कलाकारांना काम तर मिळालेच, सोबतच प्रसिद्धी आणि लोकप्रियता देखील मिळाली. एकता कपूरची अतिशय गाजलेली वेबसीरिज म्हणजे ‘गंदी बात.’ ही सीरिज एवढी हिट झाली की, या सीरिजचे दुसरे पर्व देखील आले. या सीरिजने कलाकरांना तुफान लोकप्रियता मिळवून दिली. या ‘गंदी बात २’ सीरिजमधील एक अभिनेत्री म्हणजे अन्वेशी जैन होय.

‘गंदी बात २’ या सीरिजने अन्वेशीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. यातील तिच्या बोल्ड आणि मादक अंदाजाला फॅन्सने खूप लोकप्रियता मिळवून दिली. अन्वेशीची लोकप्रियता तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकल्यावर लक्षात येईल. तिला ४० लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. ती देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून, नेहमी तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

अन्वेशीने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात ती निळ्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. समुद्राजवळील हॉटेल किंवा घराच्या बाल्कनीमध्ये तिने तिचा हा व्हिडिओ शूट केला आहे. यात ती साडीतील तिच्या विविध अदा दाखवत असून, तिचे मोकळे केस तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहे. तिने पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केले आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आले असून, शेकडो कमेंट्स देखील आल्या आहेत.

अन्वेशी नेहमी तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. याआधी देखील तिने तिचे साडी, जीन्सवरील अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंची फॅन्समध्ये खूप क्रेझ असते. अन्वेशी अभिनेत्रीसोबतच एक सूत्रसंचालक देखील आहे. तिने जवळपास एक हजार पेक्षा अधिक शोचे सूत्रसंचालन केले आहे. मात्र, तिला ‘गंदी बात २’ सीरिजने खरी ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली.

अन्वेशीचा जन्म २५ जून, १९९१ रोजी मध्यप्रदेशमधील खजुराहो येथे झाला. इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर असलेल्या अन्वेशीला कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिच्या शरीराच्या रचनेवरून खूप चिडवले जायचे. ‘गंदी बात २’ मध्ये अन्वेशीने दिलेल्या बोल्ड सीन्समुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लाल यादवच्या ‘या’ गाण्यावर अभिनेत्री राणीने लावले जोरदार ठुमके; दिलखेचक अदांना चाहत्यांची पसंती

-पती राज कौशल यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच घराबाहेर दिसली मंदिरा बेदी, आईसोबतचा व्हिडिओ तुफान व्हायरल

-‘…ती सई चोर आहे’, म्हणत मोठ्या बहिणीच्या व्यथा मांडताना दिसली मृण्मयी; सोबतच गौतमीवर लावले तिने गंभीर आरोप


Leave A Reply

Your email address will not be published.