बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या समस्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. शिल्पाच्या पतीला अश्लील व्हिडिओ बनवून ऍप्सवर अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, या सर्व संकटांमध्ये शिल्पा एका सशक्त महिलेप्रमाणे आपल्या कुटुंबाला सांभाळत आहे. अलीकडेच शिल्पाने तिच्या घरी गणपती बसवला होता. शिल्पाचे नाव त्या स्टार्समध्ये समाविष्ट आहे, जे दरवर्षी गणेश चतुर्थी मोठ्या धूमधडाक्याने साजरे करतात आणि गणपती आपल्या घरी घेऊन येते.
शिल्पाने कुटुंबासोबत केले गणपतीचे विसर्जन
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिल्पाने विघ्नहर्ता बाप्पाला तिच्या घरी आणले आणि दीड दिवसांनी तिचे विसर्जन केले. गणपतीच्या विसर्जनाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात शिल्पा तिच्या कुटुंबासह दिसत आहे. शिल्पा आणि तिची दोन मुले समिशा आणि वियान हे एकसारखे कपडे घातलेले दिसत आहेत, तर दुसरीकडे, समीशाच्या फ्लाईंग किसने चाहत्यांची मने जिंकली.
गणेश विसर्जनापूर्वी शिल्पाने पूजा केली. या दरम्यान, तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र तिच्यासोबत दिसले. हे सर्व फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. दरवर्षी लोक त्यांच्या घरात गणपती बसवतात आणि पूजा केल्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. जेणेकरून पुढच्या वर्षी गणपती पुन्हा त्यांच्या घरी येऊ शकतील.
त्याचबरोबर, शिल्पाने तिच्या घरी गणेश पूजेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या मुलांसोबत गणपतीची पूजा करताना दिसत आहे. यासह तिने लिहिले की, “दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही गणपती राजा सोबत आहे, तर प्रत्येक संकटावर मात आहे. बाप्पाची कृपा आपल्या सर्व अडचणी दूर करण्यास मदत करेल. गणपती बाप्पा मोरया.”
शिल्पा शेट्टी आजकाल तिच्या आयुष्याच्या कठीण टप्प्यातून जात आहे. तिचा पती राज कुंद्रा पहिल्यांदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिच्यासोबत नाही. या सर्व गोष्टींचा शिल्पाच्या करिअरवर आणि वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे, तरीही ती सर्व अडचणींना तोंड देत असताना तिचे सर्व काम करत आहे. रियॅलिटी शो होस्ट करण्यापासून ते गणपती पूजेपर्यंत, शिल्पा सर्व काही सहजतेने करत आहे.
शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर शिल्पा १३ वर्षांनंतर चित्रपटांमध्ये परत आली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘हंगामा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, चित्रपटाची कथा प्रेक्षकांना फारशी आवडली नाही. परेश रावल, मीझान जाफरी आणि प्रणिता या चित्रपटात तिच्यासोबत दिसले होते. शिल्पा लवकरच ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट
-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक
-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा










