Thursday, March 28, 2024

अरे वा! आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल

संजय लीला भन्साळी यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील आलिया भट्टच्या जबरदस्त अभिनयामुळे प्रेक्षकांना तिचे वेड लागले आहे. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत असून, तिच्यासोबत अजय देवगण  देखील एका अप्रतिम भूमिकेत आहे. 

‘राझी’ चित्रपटानंतर ही दुसरी वेळ आहे, जेव्हा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी आलियाचे (Alia Bhatt) सर्वत्र कौतुक होत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केल्याचे वृत्त समोर आले आहे. म्हणजेच जसा सर्वांचा अंदाज होता, अगदी तसेच घडले. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी काही वेळापूर्वीच ही माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘सूर्यवंशी’, ‘पुष्पा हिंदी’ आणि ‘८३’ या चित्रपटांनंतर ‘गंगूबाई काठियावाडी’ हा महामारीनंतर भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. याआधी या चित्रपटाने प्रदर्शनाच्या काही दिवसांतच जगभरात १०० कोटींची कमाई केली होती.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ने आलिया भट्टला नवी ओळख दिली आहे. जगभरातून या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाने आलियाही खूश आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण (Ajay Devgan) व्यतिरिक्त पार्थ समथान, सीमा पाहवा आणि शंतनू माहेश्वरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखक एस हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून घेण्यात आली आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केला असून, यामध्ये आलियाने गंगूबाई या वेश्येची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची कथा कामाठीपुरा येथील गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. जी एकदा १००० रुपयांना विकली गेली होती. त्यानंतर ती वेशा बनली. मात्र, गंगूबाईंनी आपल्या लोकांसाठी खूप काही केले होते, याचा उल्लेख चित्रपटात आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आलिया भट्ट नुकतीच ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात दिसली आहे. लवकरच ती राम चरण आणि जूनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’मध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा