Saturday, January 17, 2026
Home अन्य गंगुबाईची क्रेझ पोहोचली सातासमुद्रापार, आयफेल टॉवरसमोर महिलांनी धरला ‘ढोलिडा’ गाण्यावर ठेका

गंगुबाईची क्रेझ पोहोचली सातासमुद्रापार, आयफेल टॉवरसमोर महिलांनी धरला ‘ढोलिडा’ गाण्यावर ठेका

सध्या सोशल मीडियावर, रील्सच्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर गंगुबाई काठियावाडी सिनेमाच्या गाण्यांची आणि संवादांची जबरदस्त चलती आहे. या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच कथेमुळे, आलियाच्या अभिनयामुळे, वादांमुळे खूपच लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली ती आलियाचा अभिनय आणि तिचा लूक. आलियाने पुन्हा एकदा ती किती ताकदीची अभिनेत्री आहे हे सिद्ध केले आहे.

या सिनेमातील गाण्यांनी देखील सोशल मीडियावर धूम केली आहे. या सिनेमातील गाण्यांवर तयार होणाऱ्या रिल्सचा तर अक्षरशः पाऊस पडला आहे. गंगुबाई काठियावाडी सिनेमातील ‘ढोलिडा’ या गाण्याने तर नेटकऱ्यांना आणि डान्सरला वेडच लावले आहे. या गाण्यावरील अनेक डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर रोजच व्हायरल होताना दिसत आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या गणयवर डान्स करत आहे.

आता याच गाण्यावरील एक हटके डान्स व्हिडिओ सध्या या गाण्यावरील इतर रिल्सचा गर्दीत सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तीन महिला पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर ‘ढोलिडा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या तिन्ही महिलांनी नारंगी, पांढऱ्या आणि हिरव्या अशा भारताच्या तिरंग्यातील रंगाच्या साड्या नेसल्या आहेत. मुख्य म्हणजे या सांध्यांवर तिघीनींही शूज घातले असून, त्यांनी अगदी आलिया सारखाच हुबेहूब लूक केला आहे. त्यावर त्या जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

तत्पूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटात आलिया भट्टने कामाठीपुराची माफिया क्वीन असणाऱ्या गंगुबाईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अजय देवगण, विजय राज आणि शंतनू माहेश्वरी यांच्या प्रमुख भूमिका असून, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा