बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच द्विगुणित होणार आहे. या चित्रपटात आलियासोबत अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) देखील दिसणार आहे. या चित्रपटात त्याने मुंबईचा डॉन करीम लालाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट हिट होणार असल्याचे दिसून येत आहे.
‘हा’ चित्रपट २५ फेब्रुवारीला होणार आहे प्रदर्शित
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट या महिन्यात २५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गंगूबाई काठियावाडी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या कथेवर आधारित आहे. हे पुस्तक हुसैन झैदी यांनी लिहिले आहे.
‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टने (Alia Bhatt) आतापर्यंत ‘हायवे’, ‘उडता पंजाब’ सारखे अनेक चित्रपट केले आहेत. बहुतांश चित्रपटांमध्ये नवोदित तरुणीच्या स्टाईलमध्ये दिसली असली, तरी ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तिच्या करिअरचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे दिसते. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिची वेगळी भूमिका पाहायला मिळणार आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या प्रत्येक चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही जबरदस्त असणार आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा ट्रेलरही धमाकेदार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्यापासून कोणीही स्वत:ला रोखू शकत नाही. विशेषतः महिलांसाठी हा चित्रपट खूप खास असणार आहे, कारण हा स्त्री शक्तीवर आधारित चित्रपट आहे.
हेही वाचा –