मॉडेल आणि अभिनेत्री असणारी गौहर खान नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते. इंडस्ट्रीमध्ये गौहर ही एक उत्तम डान्सर म्हणून ओळखली जाते. गौहरने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची आणि डान्सची दमदार झलक दाखवली आहे. गौहरने डिसेंबर २०२० मध्ये प्रसिद्ध संगीतकार इस्माईल दरबार यांच्या मुलाशी जैदशी लग्न केले.
गौहरच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर गौहरने तिच्या प्रीवेडिंग फोटो, आणि लगाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो आणि मुख्य म्हणजे गौहरच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका खूप व्हायरल झाली होती. गौहरचे लग्न झाल्यानंतर गौहर कामाच्या कमिटमेंट्समुळे जैदसोबत कुठेही फिरायला गेली नव्हती. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याने आणि लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे गौहर आणि जैद हनीमूनला गेले नाही. मात्र, आता सर्व सुरळीत होत असताना आता ती हनीमूनला गेली आहे.
गौहर आणि जैद सध्या मॉस्कोमध्ये त्यांचे हनिमून एन्जॉय करत आहेत. गौहरने तिच्या हनीमूनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये हे कपल अतिशय रोमॅंटिक मूडमध्ये असून, मॉस्कोमधील रस्त्यांवर फिरत एकमेकांना किस करताना दिसत आहेत. गौहरने तिचे हे रोमँटिक फोटो पोस्ट करत लिहिले, “लव इन मॉस्को.” फॅन्समध्ये गौहर आणि जैदचे हे फोटो तुफान व्हायरल होत असून, यावर अनेक कमेंट्स देखील येत आहे. जैदने देखील या फोटोवर कमेंट करत लिहिले, ‘आय लूव्ह यू माय गौहर.’
गौहरचे हे फोटो फॅन्ससोबतच कलाकारांमध्ये देखील खूप लोकप्रिय ठरत आहे. नुकतेच गौहर आणि जैदच्या लग्नाचे सहा महिने पूर्ण झाल्याने गौहरने एक रोमँटिक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती. काही दिवसांपूर्वी गौहर खान खूप ट्रोल देखील झाली होती. फोटोग्राफर्सने मास्क काढायला लावले, तरीही तिने काढले नाही. म्हणून तिला ट्रोल केले गेले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…