Monday, July 1, 2024

‘या’ कारणामुळे शाहरुख झाला होता पुरता भयभीत; पत्नी गौरीचा मृत्यू होईल, अशी वाटायची भीती

अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या प्रेमाबद्दल आपल्या सर्वांनाच माहित आहे. हे दोघे अनेक तरुण तरुणींसाठी प्रेमाचे आदर्श आहेत. या दोघांची जोडी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. चाहत्यांना या दोघांना एकत्र पाहणे खूप आवडते. हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात, तसेच एकमेकांचा आदर देखील करतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराला न गमवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. अशात बॉलिवूडचा बादशाह एकदा त्याच्या पत्नीसाठी खूप भयभीत झाला होता.

का घाबरला होता शाहरुख खान
त्याची पत्नी आर्यन खानच्या जन्मावेळी गरोदर होती. तेव्हा तिची प्रकृती खूप नाजूक झाली होती. शाहरुखला ती मृत्यू पावेल की काय, अशी भीती वाटत होती. त्यामुळे तो खूप घाबरला होता. (Gauri was first time pregnancy Shahrukh Khan thought she will die)

मुलाकडे देखील नव्हते लक्ष
अभिनेता पत्नीच्या काळजीमध्ये एवढा घाबरला होता की, त्याचे त्याच्या मुलाकडे काहीच लक्ष नव्हते. त्याला बाळापेक्षा आई वाचणे फार महत्त्वाचे वाटत होते.
परंतु त्यांच्या आयुष्यात तसे काहीच वाईट घडले नाही. साल १९९७ मध्ये त्यांनी आर्यनला जन्म दिला. त्यांनतर त्यांनी साल २००० मध्ये एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव सुहाना आहे. तसेच साल २०१३ मध्ये ते तिसऱ्यांदा आई बाबा झाले. त्यांनी अब्राहमला जन्म दिला.

शाहरुख खानच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास तो लवकरच सिद्धार्थ आनंदच्या ‘पठाण’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे दोघे देखील प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्याला इटलीच्या आगामी कमर्शियल एंटरटेनरसाठी देखील निवडण्यात आले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, या चित्रपटामध्ये नयनतारा आणि सान्या मल्होत्रा देखील झळकणार आहेत. तसेच सुनील ग्रोवर देखील यामध्ये प्रमुख पात्र साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा