‘मला सई मनापासून आवडली…’, म्हणत गौतमी देशपांडेने सांगितला तिचा प्रवास

रोमान्स, कॉमेडी, इमोशनल ड्रामा, प्रेम, सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत या सगळ्या गोष्टींना पूरक असणारी मालिका म्हणजे झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ होय. या मालिकेने हाहा म्हणता केवळ एका वर्षभरात यश मिळवले. सर्वत्र या मालिकेची चर्चा आहे. या सोबतच चर्चा आहे, ती म्हणजे या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे कलाकार सई आणि आदित्य यांची. ही पात्र विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांनी निभावली आहेत. त्यांचे प्रेम, मस्ती, रुसवे फुगवे, काळजी या गोष्टी प्रेक्षकांना प्रामुख्याने पसंतीस पडत होत्या. या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यानिमित्त गौतमीने अत्यंत भावुक पोस्ट केली आहे.

गौतमीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘माझा होशील ना’ मालिकेमधील काही कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत. सोबतच तिने यावर एक कॅप्शन देखील लिहिले आहे. तिने लिहिले आहे की, “खूप काही बोलायचं असतं पण शब्द अपुरे पडतात, तसं झालाय अगदी माझं. गेले अनेक दिवस ठरवत होते की, काहीतरी छान सुंदर लिहावं. पण आता मात्र मन मोकळं करणार आहे मी. मागच्या वर्षी ६ फेब्रुवारीला ‘माझा होशील ना’चा ऑडिशन कॉल आला होता. ऑडिशन-सिलेक्शन-मिटिंग-प्रोमो शूट-टायटल सॉन्गशूट-फोटोशूट आणि फायनली सीरिअलचं शूट हे ७ ते १२ फेब्रुवारीमध्ये वायुवेगाने घडलं. यानंतर एक अत्यंत सुंदर असा प्रवास चालू झाला. जेव्हा आपल्याला एखादी भूमिका खूप मनापासून आवडते तेव्हा ती परफॉर्म करण्याची मजा काही औरच असते. मला सई मनापासून आवडली आणि म्हणूनच कदाचित तुमच्याही मनात घर करून बसली. सईने मला आयुष्यभर पुरतील एवढया आठवणी दिल्या आहेत. या प्रवासात कोरोना नावाचं संकट येऊन गेलं तरीही त्या सगळ्यातून ताणून सुलाखून आम्ही बाहेर पडलो, तर ते तुम्हा प्रेक्षकांमुळे आणि आमच्या प्रबळ इच्छा शक्तीमुळे.”

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

ती पुढे म्हणाली की, “या प्रवासात काही माणसांचा मनापासून उल्लेख करायचा आहे. सर्वात आधी थँक यू झी मराठी. सोजल ताई, मृण्मयी ताई, निलेश सर आणि सुबोध दादा मला ‘सई’ दिल्याबद्दल. अनिकेत आणि सुबोध दादा तुम्हाला अपेक्षित सई मी साकारण्याचा प्रयत्न केला. तरीही, काही राहून गेलं असेल तर सॉरी. तुमच्यामुळे सई कळाली. थँक्स मला सई शोधून दिल्याबद्दल. थँक्स सईला डॅशिंग समशेरसिंग आणि हळुवार रातराणी बनवणारे डायलॉग दिल्याबद्दल.” (gautami deshpande get emotional while sharing memories of maza hoshil na)

गौतमीने केलेल्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. अनेकजण मालिका बंद झाल्याचा खेद व्यक्त करत आहेत. सई हे बिनधास्त पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. तसेच या मालिकेत अनेक ट्विस्ट आले होते. त्यामुळे मालिका देखील प्रेक्षकांना आवडत होती. पण आता मालिका बंद झाल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

Latest Post