gautami patil father’s death |लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (gautami patil) हिच्याबाबत एक अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे गौतमी पाटील च्या वडिलांचे निधन झालेले आहे. मागील चार ते पाच दिवसांपूर्वी तिचे वडील धुळ्यामध्ये बेवारस अवस्थेत सापडले होते. या गोष्टीबाबत गौतमीला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा तिने लगेचच पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले परंतु उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले आहे.
गौतमी पाटीलच्या वडिलांचे पूर्ण नाव हे रवींद्र बाबुराव पाटील असे आहे. गौतमीने मुलाखतीमध्ये आधीच सांगितले होते की तिच्या वडिलांना दारूचे व्यसन होते आणि त्यामुळेच ते ती आणि तिच्या आईला सोडून गेले होते. पुण्यात उपचारादरम्यान त्यांच्या दोन्ही किडन्या आणि दोन्ही लिव्हर खराब झाल्याची माहिती समोर आली चिंतामणी रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार चालू होते परंतु त्यांची मृत्यूची झुंज संपली आणि त्यांनी उपचारादरम्यानच अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गौतमी पाटीलचे वडील हे आजोळकर नगर या भागामध्ये सापडले होते त्यावेळी स्वराज्य फाउंडेशनच्या एका व्यक्तीने त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला परंतु नंतर ते गौतमी पाटीलचे वडील असल्याची गोष्ट समोर आली.
जेव्हा तिला तिच्या वडिलांची प्रकृती समजली तेव्हा तिने लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी ती म्हणाली होती की, “माझ्या वडिलांनी आमच्यासाठी कधीच काय केलं नसलं तरी माणुसकीच्या नात्याने जेवढे शक्य आहे तेवढे मी नक्कीच करेल आणि यापुढे वडिलांची काळजी नक्कीच घेईल.” परंतु तिची ही इच्छा पूर्ण झाली नाही तिच्या वडिलांनी उपचारादरम्यानच शेवटचा श्वास घेतला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘त्या दिवशी मी काम करायचे थांबवेन’, अशोक सराफ असं का म्हणाले? वाचा सावितर
Rajinikanth Movie Jailer | ‘जेलर’ चित्रपटात राकेश रोशन यांचा अपमान, सेन्सर बोर्डाने ताकीद देऊन केले अर्धे सीन कट