Ashok Saraf | मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार आहेत परंतु अशोक सराफ हे (Ashok saraf त्यांच्यापैकी एक अष्टपैलू कलाकार आहेत त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक एका पेक्षा एक चित्रपट दिलेले आहेत गंमत जंमत,बाळाचे बाप ब्रम्हचारी, अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा यांसारखे अनेक कॉमेडी चित्रपट त्यांनी कलाविश्वाला देऊन संपूर्ण प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यामुळे सगळे प्रेक्षक काहीतरी मनोरंजन सृष्टीतील सगळे कलाकार देखील त्यांचा खूप आदर करतात अशातच अभिनेते मिलिंद गवळी यांनी अशोक सराफ यांच्या सोबतचा एक किस्सा शेअर करत पोस्ट केली आहे.
अशोक सराफ यांचे 70 होऊन अधिक वय आहे परंतु अजूनही ते अनेक चित्रपटात काम करतात नुकतेच काही दिवसापूर्वी त्यांचा वेळ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघून नेहमीच सगळ्या कलाकारांना काम करण्याची आणखी ऊर्जा मिळते. काही महिन्यांपूर्वी अशोक सराफ यांना आजार झाला होता त्यामुळे त्यांना बोलता देखील येत नव्हते परंतु मी या क्षेत्रातील काम कधीच सोडणार नाही असे त्यांनी मिलिंद गवळी यांना सांगितले होते आणि याविषयीची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
यावेळी मिलिंद गवळी यांनी सांगितले की अशोक सराफ मला म्हणाले होते की, “ज्यावेळी सकाळी उठल्यानंतर मला असे वाटेल की अरे यार आज मला शूटिंग आहे आणि मला कंटाळा आला आहे असे ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी मी काम करायचे थांबून आणि खरंच मला तर सकाळी पाच वाजता उठल्यावर शूटिंग करायचा उत्साह असतो अगदी फिल्म सिरीयल शूटिंग असो किंवा अगदी फोटोशूट असलं तरी माझा उत्साह कमी होत नाही.”
अशाप्रकारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी अशोक सराफ यांच्या सोबतचा हा किस्सा सोशल मीडियावर शेअर करून त्यांचे कामाप्रती असणारे प्रेम व्यक्त केले आहे त्यामुळे प्रत्येक कलाकाराने हा त्यांच्याकडून घ्यावा असे देखील मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.
अभिनेते मिलिंद गवळी हे सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये काम करत आहेत. या मालिकेत त्यांची भूमिका नकारात्मक असली तरी सगळ्या प्रेक्षकांना त्यांची ही भूमिका खूप आवडत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
Rajinikanth Movie Jailer | ‘जेलर’ चित्रपटात राकेश रोशन यांचा अपमान, सेन्सर बोर्डाने ताकीद देऊन केले अर्धे सीन कट
teachers day 2023 | ‘हे’ चित्रपट दाखवतात गुरु आणि शिष्यामधील प्रेमळ नाते, एकदा नक्की पाहा