Wednesday, July 3, 2024

गौतमी पाटीलविरोधात मनसेची आक्रमक भूमिका, ‘अश्लिल डान्सवरआवर घाला नाही तर..’

महाराष्ट्र राज्यातील लोक नृत्य म्हणजे लावणी.  बाईचा नखरा आणि ठसका हे तिच्या अंदाजात प्रदर्शन करणे म्हणजे लावणी. मात्र, सध्या महाराष्ट्राच्या लोकनृत्यावर भलतेच कारस्थान केलं जात आहे. लावणी करत असताना अश्लिल चाळे करुन लावणीला बदनाम केलं जात आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या डान्सने प्रेक्षकांना वेडं करणारी लावणी कलाकार आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लावणी करत असताना सतत अश्लिल चाळे करत असल्यामुळे तिला लावणी कलाकारांनीही बजावले होते. आता मात्र मनसेनंही तिच्या लवणीवर विरोध केला आहे.

पुण्यातील प्रसिद्ध लावणी कलाकार गौतमी पाटील (Gautami Patil) हिने आवघ्या महाराष्ट्राला आपल्या लावणीने वेड लावले आहे. मात्र, ती लावणी करत असताणा काही अश्लिल चाळे केल्यामुळे तिला लावणी कलाकारांचे आणि महाराष्ट्रातील लोकनृत्याला बिघडवण्याचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी तिच्यावर टीका केली होती. त्यामुळे गौतमी खूपच चर्चेत आली होती. आता मात्र, मनसे पक्षानेही तिच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र नवानिर्माण सेना विद्यार्थी यांनी, “गैतमी पाटील हिच्या अश्लिल डान्सवर आवर घाला नाही तर गृहमंत्रालय कार्याच्या काचा फोडण्यात येतील.” असा खडतर शब्दात टीका करत जालन्यातील सेवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकामार्फत पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्याशिवाय मनसेने पत्रामध्ये लिहिले की, गौतमी पाटील ही लावणी करत असताना अश्लिल हावभाव करत डान्स करते. त्याशिवय ती सोशल मीडिवरही व्हिडिओ बनवत असताना त्याचप्रकारे हावभाव देत असून अंगप्रदर्शन करत असते. त्यामुळे महाराष्ट्रात अश्लिलतेचे वातावरण निर्माण होत आहे. तिच्या वाईट वागणुकीमुळे तरुणांवर परिणाम होत आहेत. गैतमी पीटील हिच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेने पत्राद्वारे केली.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखिल गौतमीवर संताप व्यक्त केला होता. त्यांनी गैतमी पाटील हिला फटकार लावत सांगितले होते की, लावणी ही महारष्ट्राची शान आहे. त्याचा योग्यप्रकारे गौरव व्हायला पाहिजे. त्याचे योग्यपद्धतीने सादरीकरन व्हायला पाहिजे. आता तसे होत नाही आणि म्हणून चुकीचा पायंडा पडत आहे. अशाप्राकरे त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पुणेकरांनीही संताप व्यक्त करत म्हटले आहे की, जर असेच सुरु राहिले तर एक दिवस महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दु:खद! ऑस्कर विजेत्या गायिका आणि अभिनेत्रीचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन
टीव्हीवरील साधी- भोळी सून टीना दत्ता बनलीय बोल्ड; टॉपलेस फोटो शेअर करत वाढवला इंटरनेटचा पारा

हे देखील वाचा