टीव्ही अभिनेत्री टिना दत्ता ही एक साधी- भोळी सून म्हणून ओळखली जाते. ‘उतरण’ या मालिकेतून ती एक संस्कारी सून बनून घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील तिचे पात्र आणि अभिनय सर्वांना खूप आवडला होता. टीव्हीवर ही टिना जेवढी सिंपल होती, तेवढीच ती तिच्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. टिना ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सध्या तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
टिनाचा जन्म 27 नोव्हेंबरला झाला आहे. टिनाने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अत्यंत साध्या सोज्वळ टिनाला या हॉट अवतार पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत, तर काही चाहत्यांना तिचा हा अंदाज खूपच आवडला आहे. सगळेजण कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
टिनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती हॉट पोज देत आहे. तसेच तिने सनग्लासेस घातले आहे. टिनाने हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “मी तापमान वाढवले आहे का? मला असं वाटतं की, नवीन महिन्यात एक नवीन बदल असायला हवा. हा एक एडिट फोटो आहे. पण जर तुम्हाला तुमची स्किन आवडत असेल तर ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. जी गोष्ट तुम्हाला आवडते तीच करा बाकीकडे लक्ष देऊ नका.”
टिनाने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोमध्ये तिने सोनेरी रंगाचा गाऊन घातला आहे. अनेक कलाकार देखील कमेंट करत आहेत.
टिना दत्ता शेवटची बिग बॉस 14 मध्ये दिसली होती. ती या शोमध्ये पाहुणी बनून गेली होती. यासोबत तिने ‘डायन’, ‘खतरों के खिलाडी’, ‘कोई आने को है’ यामध्ये काम केले आहे. आता ती बिग बॉस 16 भाग बनली असून खूप चांगल्याप्रकारे ती खेळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ज्याच्या स्टाईलवर आख्खं जग होतं फिदा, तोच मायकल जॅक्सन गायचा बप्पी दांचे गोडवे; म्हणालेला…
नुसरत भरुचाच्या मनमोहक अदा, पाहताक्षणीच पडाल प्रेमात