Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बन ठन चलि देखो!’, गायत्री दातारने शेअर केला फोटो; पाहा तिच्या सोज्वळ अदा

सध्याच्या काळात सर्वचजण सोशल मीडियावर वेळ घालणे पसंत करतात. त्याप्रमाणे, ‘तुला पाहते रे’ फेम गायत्रीही सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. फोटो असो वा व्हिडिओ, ती सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. कदाचित यामुळेच तिचे फोटो दरदिवशी इंटरनेटवर व्हायरल होतात. नुकताच गायत्रीने शेअर केलेला फोटो आता चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यासोबत फोटोचे कॅप्शनही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

गायत्री विशेष करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. हा लेटेस्ट फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने अबोली रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केलेला पाहायला मिळत आहे. यासोबतच केस मोकळे सोडून गायत्रीने तिचा हा सुंदर लूक पूर्ण केला आहे.

हा सुंदर फोटो शेअर करत, गायत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “बन ठन चलि देखो!” फोटोसोबत हे कॅप्शनही चाहत्यांना आवडल्याचे दिसून येत आहे. नेहमीप्रमाणे या फोटोलाही चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून हे प्रेम व्यक्त करत आहेत. (gayatri datar shared photo and said ban than chali dekho)

‘तुला पाहते रे’ मधून टीव्हीवर पदार्पण करून, तिने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या सोज्वळ आणि निरागस अभिनयाच्या जोरावर तिने अमाप लोकप्रियता मिळवली. अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या गायत्रीने, आपल्या कॉमिक टायमिंगने देखील सर्वांना प्रभावित केले आहे. ‘तुला पाहते रे’ मालिका संपल्यानंतर तिने ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी शोमध्ये काम करून, प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा