अगदी लहान वयातच मनोरंजन क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारा अंकित यादव हा ‘जो देसी रेकॉर्ड हरियाणवी म्युझिक लेबल’ चा निर्माता आहे. अलीकडेच युट्युबवर अंकितने बनवलेल्या ‘५२ गाज का दमन’ या गाण्याने त्याचेच मागील सर्वच रेकॉर्ड तोडले आहेत. त्यात केवळ चार आठवड्यात ६४० दशलक्षाहुन अधिक लोकांनी ते पाहिले आहेत. त्याचे हे गाणे इंडस्ट्रीमधील सर्वाधिक हिट्स मिळालेल्या म्युझिक ट्रॅकच्या यादीत सामील झाले आहे.
आपले हे यश अबाधित राखण्यासाठी तो खूप परिश्रम घेत आहे. आपल्या कंटेंट आणि लेबलसाठी तो डिजिटल राइट्स निर्मात्याची व्यवस्था करत आहे, सोबतच त्यासाठी लागणाऱ्या सर्व पाठपुराव्याची व्यवस्था करत आहे. आपला मित्र धीरज जोरवाल याच्या समवेत तो आपल्या कंपनीच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या ब्रँडिंगसाठी मदत करत आहे. निर्माते आणि प्रेक्षक यांच्यात संबंध चांगले प्रस्थापित व्हावे हेच त्याचे एकमेव ध्येय आहे. निफ्ट कांगडा महाविद्यालयातून त्याने डिझायनिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तर त्यातूनच त्याच्या डिजिटल कंटेंट उद्योगात रुची वाढत गेली आणि कालांतराने त्याचा अनुभव देखील वाढला.
अंकितने अनेक बातम्यांचे पोर्टल आणि फेसबुकमधील प्रेक्षकांच्या मदतीने ऑनलाइन बातम्या आणि लेखाद्वारे आपल्या या यात्रेची सुरवात केली केली. आपल्या कॉलेज दरम्यान त्याचा हा अनुभव वाढत गेला, असे तो म्हणतो. सोबतच आपल्या विसीओआय या कंपनी संदर्भात देखील त्याने महत्त्वाच्या पैलूंची माहिती दिली, ज्यात ते कशा प्रकारे ऑडिओ आणि व्हिडीओद्वारे नवनविन क्रियेटर्सना आपल्या या उपक्रमात सामील करू घेऊ इच्छित आहे.
या युट्युबर्स सोबत केले काम
अंकीतने अमित भडाना, हर्ष बेनिवाल, राउंड टू हेल, एलविश यादव यांच्यासारख्या मोठ्या कंटेंट क्रिएटर्ससाठी काम केले आहे. सोबतच आपल्या लेबलसाठी डिजिटल राईट्स मॅनेजमेंटला सुद्धा सांभाळत आहे. त्याच्या कंपनीचे लक्ष्य हे युट्युब, युट्युब संगीत आणि अन्य म्युझिक स्ट्रिंमिंग प्लॅटफॉर्मवर आपले गाणे वितरित करणे हे आहे, ज्यात एमेझॉन संगीत, अँपल संगीत सारख्या नामांकित नावांचा समावेश आहे.
चार आठवड्यातच गाणे झाले प्रसिद्ध
हरियाणवी संगीत इंडस्ट्रीतील ‘५२ गाज का दम’ या गाण्याने खूपच प्रसिद्धी मिळवली आहे. प्रत्येकाच्या ओठावर येणारे ह्या गाण्याने अवघ्या चार आठवड्यातच रसिकांच्या मनावर राज्य केले. आपल्या यादीतील सर्वोत्तम विक्रम करत सर्वच हरियाणवी गाण्यांना मागे टाकले. ह्या गाण्यामुळे अंकित यादव युट्यूबवर नव्याने ओळखू जाऊ लागला.