अभिनेत्री आणि मॉडेल गीता बसरा एक चांगलीच लोकप्रिय आहे. गीताने बॉलिवूडमध्ये बरेच काम केले. परंतु तिला लोकप्रियता क्रिकेटर हरभजन सिंगसोबत लग्न केल्यानंतर मिळाली. त्यांचे प्रेम, रुसवे – फुगवे या सगळ्याच गोष्टी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतात. बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आज १३ मार्च रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्यांची प्रेमकहाणी.
गीताचा जन्म १३ मार्च १९८४ मध्ये झाला. गीता एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हरभजन सिंग एकदा लंडनमध्ये क्रिकेट मॅच खेळत होता. त्यावेळी गीताचा :वो अजनबी’ हा व्हिडिओ अल्बम प्रदर्शित झाला. हा अल्बम हरभजनने पाहिला आणि त्याला तो खूप आवडला. इतका की, हे गाणे पाहिल्यानंतर तो लगेच गीताला भेटायला गेला. त्यानंतर तो तिला भेटण्याची संधी शोधत असायचा. (Geeta Basra celebrate her birthday let’s know about her love story,)
गीताचा मोबाईल नंबर शोधणे ही काही हरभजनसाठी मोठी गोष्ट नव्हती, कारण बॉलिवूडमध्ये त्याची चांगली ओळख होती. मॅच झाल्यानंतर त्याने त्याच्या एका मित्राकडून गीताचा नंबर घेतला आणि त्याला तिला भेटायचे आहे असे सांगितले. गीताने त्याचा मेसेज पाहिला, परंतु ४ दिवस तिने काहीच रिप्लाय दिला नाही. त्यानंतर एक एक क्षण भज्जीसाठी कठीण होता. तिचा रिप्लाय आला नाही याचे त्याला खूप दुःख झाले होते.
View this post on Instagram
त्यानंतर गीताने एकदा हरभजनला मेसेज केला की, तिला आयपीएलसाठी दोन तिकीट पाहिजे आहेत. हरभजनला देखील हेच हवे होते. त्याने लगेच दोन तिकिटांची व्यवस्था केली. त्यानंतर आयपीएल दरम्यान त्याने तिला प्रपोज केले. त्यावेळी गीताने उत्तर दिले की, “तिला आता तिचा फोकस करिअरवर करायचा आहे. तिला रिलेशनमध्ये यायचे नाही.”
यानंतर त्यांच्यात मेसेज द्वारे चर्चा होत राहिली. यानंतर गीताच्या फ्रेंडने तिला पटवून दिले की, हरभजन एक चांगला व्यक्ती आहे. हळूहळू बोलताना गीताला देखील ही गोष्ट समजायला लागली. तसेच गीताने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना दोघांना एकत्र आणण्यासाठी मिडियाचे खूप मोठे योगदान आहे. हरभजनने सांगितले की, त्याने जेव्हा गीताला लग्नासाठी विचारले तेव्हा तिने त्यावेळी नकार दिला होता. नंतर त्यांच्यात वाद झाले इतके की, तिने सांगितले की, तिने इतर कोणत्यातरी मुलाशी लग्न केले आहे.
हरभजन गीतावर तेव्हा खूप प्रेम करत होता. गीताला देखील तो खूप आवडत होता. शेवटी दोघांमधील प्रेमाने त्यांना एकत्र आणले. त्यानंतर २०१५ साली त्यांनी लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात ते दोघेही खूप खुश आहेत. गीता ने बॉलिवूड मध्ये काम करण्याआधी ती एक मॉडेल होती. तिने ‘द ट्रेन’, ‘दिल दिया हैं’, ‘सेकंड हॅण्ड हसबंड’, ‘जिला गाझियाबाद’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच
मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री