हरभजन सिंगने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पत्नी गीता बसराने लिहिली भावनिक पोस्ट, दिले नव्या इनिंगचे संकेत


भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू असणाऱ्या स्पिनर गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. शुक्रवार (२४ डिसेंबर) रोजी हरभजनने त्याच्या निवृत्तीची घोषणा करताना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तर हरभजन सिंगची पत्नी असणाऱ्या अभिनेत्री गीता बसराने (Geeta Basra) देखील सोशल मीडियावर हरभजन सिंगसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

गीता बसराने हरभजनसाठी पोस्ट करताना तिचे आणि हरभजन सिंगचे काही क्यूट फोटो शेअर करत तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गीताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला माहित आहे की, तू या क्षणाची खूप वाट बघत होतास. मानसिकरीत्या तर तू आधीच हे ठरवले होते, मात्र शारीरिकरित्या अधिकृत पद्धतीने तुला ही औपचारिक घोषणा करण्याची होती. मी आज हे सांगू इच्छिते की, मला तुझा खूप अभिमान आहे. तू खूप काही तुझ्या करिअरमध्ये मिळवले. तर दुसरीकडे आयुष्यात पुढे जाण्याचा तुझा हा प्रवास असच सुरु राहणार आहे. जिथे अनेक गोष्टी तुझी वाट बघत आहे. तुला खेळताना तुझा तणाव, चिंता यांच्यासोबतच तुझी मजा मस्ती, उत्साह हे सर्व मी जवळून पाहिले आहे.”

गीताने पुढे लिहिले, “तुझे तुझ्या शानदार करिअरसाठी खूप खूप अभिनंदन. २३ वर्ष खेळणे ही काही साधी बाब नाही. मी खूपच भाग्यशाली आहे की, तुझ्या सर्व चढ-उतारा दरम्यान मी तुझ्यासोबत होती. यासोबतच खूप आनंद आहे की, आपल्या मुलीने हिनायाने तिच्या बाबांना स्टेडियममध्ये खेळताना पाहिले. मला माहित आहे, हा शेवट नाही. तू खूप काही विचार करून ठेवले आहे, मात्र नशीब आपल्या हातात नसते. तू नेहमीच तुझ्या चिकाटी, हिमतीसोबत खेळलास. आयुष्यातील दुसऱ्या अध्यायासाठी आणि येणाऱ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.”

तत्पूर्वी हरभजन सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेताना लिहिले की, “मी त्या खेळाला अलविदा म्हणत आहे, ज्यामुळे मला माझ्या आयुष्यात सर्व काही मिळाले. मी सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी मला माझ्या २३ वर्षांच्या करिअरला सुंदर आणि अविस्मरणीय बनवले आहे.” हरभजन सिंगने मोठ्या पडद्यावर देखील पदार्पण केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!