पाण्याच्या जोरदार प्रवाहात ‘मनिके मागे हिथे’ गाण्यावर जिनिलियाने घेतली मजा; व्हिडिओवर लाखो लाईक्सचा वर्षाव


अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही मागील अनेक वर्षापासून चित्रपटांपासून दूर आहे. परंतु सध्या ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी आपल्या व्हिडिओ आणि फोटोने चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने पती रितेश देशमुखसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे. त्याचबरोबर रितेश आणि जिनिलिया यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

याच दरम्यान जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या मध्यभागी आहे आणि वातावरणाचा आनंद घेत आहे. व्हिडिओ शेअर करत जिनिलियाने लिहिले की, “कारण मला हे गाणे आवडते.” अशाप्रकारे ती निसर्गाचा पुरेपूर आनंद घेत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

एवढंच नाही, तर एका व्हिडिओमध्ये जिनिलिया पती रितेश आणि मित्रांसोबत डान्स करताना दिसत आहे. तिचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहेत. रितेश देशमुख आणि टीव्ही अभिनेता शब्बीर अहलुवालिया आणि कांची कौल देखील जिनिलियाने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. ज्यामध्ये जिनिलिया ‘टिप टिप बरसा पानी’ वर नाचत आहे. या व्हिडिओसह जिनिलियाने लिहिले की, “टिप टिप बरसा पानी, कांची कौल आणि शब्बीर अहलुवालिया यांच्यासोबत छान. सोबत रितेश देशमुख सुद्धा.”

जिनिलियाला बॉलिवूडमध्ये २००८ मध्ये आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे ओळख मिळाली. जरी याआधी ती रितेश देशमुखसह ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटात दिसली होती. जिनिलियाने ‘तेरे नाल लव हो गया’, ‘मस्ती’, ‘फोर्स’ सारखे चित्रपटही केले आहेत. बॉलिवूडव्यतिरिक्त जिनिलियाने साऊथच्या अनेक बड्या स्टार्ससोबतही काम केले आहे. ज्यात ‘वेलायुद्धम’, ‘ऑरेंज’, ‘उरुमी’, ‘हॅपी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.