Saturday, October 19, 2024
Home मराठी ‘नवरोबा मला तुझा गर्व आहे,’ या कारणासाठी जिनिलियाने केले रितेशची कौतुक

‘नवरोबा मला तुझा गर्व आहे,’ या कारणासाठी जिनिलियाने केले रितेशची कौतुक

गेले दोन वर्ष प्रेक्षक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची वाट पाहत आहे होते. अखेर हा सिझन आलेला आहे. या सीजनमधील तीन आठवडे देखील पूर्ण झालेले आहे. हा सिझन सगळ्यांना चांगलाच पसंत पडला आहे. या वर्षाच्या सीजनमध्ये अनेक नवनवीन बदल झालेले आहे. यासोबतच सगळ्यात मोठा बदल होता. तो म्हणजे यावर्षीच्या सिझनमध्ये बिग बॉसने त्यांचा होस्ट देखील बदलला. याआधी महेश मांजरेकर हे बिग बॉस मराठी होस्ट करायचे. परंतु या सीजन पासून अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करणार आहे. रितेश देशमुखने त्याच्या विकेंड वारला भाऊचा धक्का असे नाव दिलेले आहे.

सध्या भाऊचा धक्का चांगलाच गाजताना दिसत आहे. बिग बॉस मराठी सुरू होऊन अवघे तीन आठवडे झाले आहे. परंतु या सिझरने टीआरपीच्या शर्यतीत त्यांच्या स्थान चांगलेच टिकून ठेवलेले आहे. भाऊचा धक्का प्रेक्षकांना जास्त आवडत आहे. या आठवड्यात भाऊच्या धक्क्याने 3.2 टीव्हीआर टीआरपीच्या सर्व रेकॉर्ड्स तोडले आहे. याआधी बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरने आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक करून 2.4 टीव्हीआर मिळवला होता. परंतु सध्या भाऊच्या सगळ्या रेकॉर्डिंग तोडलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला बिग बॉसचा हा सीझन आवडत आहे यात कोणतीही शंका नाही.

अशातच आता रितेश देशमुखची पत्नी जिनीलिया देशमुख हीने पोस्ट करून तिच्या नवऱ्याच्या कौतुक केलेले आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिले आहे की, “जेव्हा तू मला बिग बॉस करणार असल्याचे सांगितलं होत, तेव्हा मला माहित होतं की, तू चांगलंच करणार आहे. पण तू रेकॉर्ड ब्रेक केलास नवरोबा मला तुझा गर्व आहे.” अशाप्रकारे जिनीलियाने ही पोस्ट केलेली.

सध्या बिग बॉसच्या घरात अरबाज पटेल हा नवीन कॅप्टन झालेला आहे. त्याचप्रमाणे योगिता, निखिल, अभिजीत आणि सुरज हे सदस्य नॉमिनेट झालेले आहे. त्यामुळे आता या आठवड्यात कोणता सदस्य एलिमिनेट होणार आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

प्रेक्षकांच्या नजरेत तुमचा गेम ओव्हर झाला आहे! रितेशने सुनावले वैभवला खडे बोल…
पुरस्कारांच्या बाबतीत शाहरुखने मांडले मत; म्हणाला, ‘माझ्याकडे 300 हून अधिक पुरस्कार…’

 

हे देखील वाचा